रागीट तैमुर आता शांत झाला, फोटोग्राफरला आता हाय हॅलो करतो…!

रागीट तैमुर आता शांत झाला, फोटोग्राफरला आता हाय हॅलो करतो...!

बॉलिवूडचा स्टार किड म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान हा नेहमीच चर्चेत असतो.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jan 31, 2021 | 10:44 AM

मुंबई : बॉलिवूडचा स्टार किड म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान हा नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याची फॅन फॉलोईंग ही कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून तैमूर फोटोग्राफरकडे बघून खूप चिडताना दिसत होता. मात्र, शनिवारी तैमूर करिना कपूरसोबत मुंबईत दिसला त्यावेळी त्याने फोटोग्राफरकडे पाहून हॅलो करत फोटोसाठी पोज देखील दिल्या. (Kareena Kapoor and Taimur Ali Khan were spotted in Mumbai)

यावेळी करिनाने काळ्या ड्रेसचा घातला होता. करिना आणि तैमूर दोघेही करिश्मा कपूरच्या घरी जात होते. करीनानं एका मुलाखती दरम्यान सांगितलं की, ‘जेव्हा तैमूर माझ्या पोटात होता, तेव्हा प्रत्येकजण मला भरपूर खायला सांगायचे. सारखं पराठा खा, तूप खा, दूध घे आणि म्हणूनच माझं वजन 25 किलोनं वाढलं होतं. मात्र यावेळेस मला पुन्हा त्याच चुकांची पुनरावृत्ती करण्याची इच्छा नाही. मला माहित आहे की माझ्या शरीराची काय गरजेच आहे.’

तैमूरची आजी शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीत तैमूरला मिळत असलेल्या मीडिया अटेंशनबद्दल सांगितलं होतं, ‘मला तैमूरची काळजी वाटते. तैमूर सध्या खूप लहान आहे त्यामुळे त्याला सध्या काही कळत नाही, मात्र जेव्हा तो मोठा होईल आणि जर तेव्हा त्याला अटेंशन मिळालं नाही तर मग त्याच्यावर खूप परिणाम होतील. म्हणूनच आम्हाला त्याची काळजी वाटते.’ सोबतच शर्मिला यांनी मीडियाला एक विनंती देखील केली होती, ‘तैमुर खूप साधा आहे. त्यामुळे मीडियानं त्याच्या संदर्भात थोडं सेंसिटिव्ह राहावं.’ असं त्या म्हणाल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

So Expensive | नोरा फतेहीच्या ‘या’ ड्रेसची किंमत ऐकल्यानंतर बसेल धक्का!

Release date | अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला!

Major : 26/11 चे हिरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना महेश बाबूंचा सलाम, ‘मेजर’ चित्रपटाची तारीख जाहीर

(Kareena Kapoor and Taimur Ali Khan were spotted in Mumbai)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें