Khoya Khoya Chand | ‘साकी-साकी’ गाण्याने प्रेक्षकांना घातली भुरळ, एका शस्त्रक्रियेमुळे उद्ध्वस्त झाले कोयना मित्राचे करिअर!

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्स नंबर आणि हॉटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कोएना मित्रा (Koena Mitra) आता रुपेरी पडद्यापासून पूर्णपणे गायब आहे.

Khoya Khoya Chand | ‘साकी-साकी’ गाण्याने प्रेक्षकांना घातली भुरळ, एका शस्त्रक्रियेमुळे उद्ध्वस्त झाले कोयना मित्राचे करिअर!
कोएना मित्रा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 31, 2021 | 10:05 AM

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्स नंबर आणि हॉटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कोएना मित्रा (Koena Mitra) आता रुपेरी पडद्यापासून पूर्णपणे गायब आहे. अभिनेत्रीच्या एका चुकीने तिचे करिअर पूर्णपणे बुडले आहे. कोयनाने काही वर्षांपूर्वी तिचे सौंदर्य अधिक बहरून यावे यासाठी एक विशेष शस्त्रक्रिया केली होती. परंतु, या शस्त्रक्रियेचा विपरित परिणाम अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर झाला. ज्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे खराब झाला. शस्त्रक्रियेतील अपयशानंतर कोएनाला तिच्या आयुष्यात खूप समस्यांना सामोरे जावे लागले. कोयना संजय दत्तच्या प्रसिद्ध चित्रपट ‘मुसाफिर’च्या ‘साकी-साकी’  या गाण्यामध्ये जबरदस्त आयटम नंबर करताना दिसली होती.

अभिनेत्रीने तिच्या चेहऱ्यावर करेक्शन सर्जरी केली होती, ज्याचे नाव ‘Rhinoplasty’ आहे. या शस्त्रक्रियेचा अभिनेत्रीच्या चेहर्‍यावर खूप वाईट परिणाम झाला आणि तिच्या चेहऱ्यावरही दुष्परिणाम झाले. झूम चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले होते की, ‘प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. शस्त्रक्रियेनंतर माझ्या चेहऱ्यावर खूप सूज आली. ज्याप्रमाणे शरीराची हाडे जोडण्यासाठी कित्येक महिने लागतात, त्याचप्रमाणे माझ्या चेहऱ्याला योग्य होण्यासाठी एक वर्ष लागले.’ तिने पुढे सांगितले की, माझी शस्त्रक्रिया चुकीची झाली नव्हती. पण त्याची चेहऱ्यावर चुकीची प्रतिक्रिया दिसून आली होती. ज्यामुळे माझे गाल आणि हाडे खूप खराब झाले होते. चेहरा पाण्याने भरला होता. ज्यामुळे मी खूप कुरूप दिसू लागले होते.

अभिनेत्रीचे वैयक्तिक जीवन

कोएना मित्राला तिच्या शाळेच्या दिवसांपासून मॉडेल बनण्याची इच्छा होती. ज्यामुळे तिने शिक्षण घेत असताना मॉडेलिंग करिअरमध्ये पाऊल ठेवले. जिथे 2002 पर्यंत तिने भारताच्या अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. अभिनेत्रीने अनेक सुपरहिट व्हिडीओ देखील बनवले, जे प्रेक्षकांना खूप आवडले. त्यानंतर राम गोपाल वर्माने अभिनेत्रीला त्याच्या ‘रोड’  चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता.

अभिनेत्रीला तिच्या हॉट स्टाईलमुळे अनेक चित्रपटांमध्ये काम मिळाले. यासह, त्याला टीव्हीवरही काम करण्याच्या बऱ्याच ऑफर देखील येत होत्या. अभिनेत्री ‘झलक दिखला जा’ सीझन तीन या डान्स रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली होती आणि त्यानंतर ती 2019मध्ये ‘बिग बॉस 13’मध्ये देखील पाहिले होते. पण, त्यानंतर अभिनेत्री पूर्णपणे गायब झाली आहे.

(Khoya Khoya Chand actress Koena Mitra’s career was ruined by a surgery)

हेही वाचा :

मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी अक्षय कुमार सज्ज, ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘बेल बॉटम’!

 सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, कॉमेडीयन ‘बिग बॉस 15’मध्ये सहभागी होण्याची शक्यता!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें