Khoya Khoya Chand | रागीट स्वभावामुळे प्रसिद्ध होती तब्बूची बहीण फराह नाझ, इंडस्ट्री सोडून आता काय करतेय?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 10, 2021 | 10:02 AM

80 आणि 90च्या दशकातील अशा काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जाते. यातीलच एक अभिनेत्री फराह नाझ (Farah Naaz) आहे. आपल्या अभिनय कारकीर्दीत फराहने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Khoya Khoya Chand | रागीट स्वभावामुळे प्रसिद्ध होती तब्बूची बहीण फराह नाझ, इंडस्ट्री सोडून आता काय करतेय?
फराह नाझ
Follow us

मुंबई : 80 आणि 90च्या दशकातील अशा काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जाते. यातीलच एक अभिनेत्री फराह नाझ (Farah Naaz) आहे. आपल्या अभिनय कारकीर्दीत फराहने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिला तिच्या काळातील एक अतिशय रागीट अभिनेत्री मानले जात असे. कारकीर्दीच्या शिखरावर असताना लग्न करून फराह इंडस्ट्रीमधून गायब झाली होती. आज आपल्या खास खोया खोया चांदमध्ये आपण फराह नाझबद्दल जाणून घेऊया…(Khoya Khoya Chand know about Faasle movie fame actress Farah Naaz)

फराहने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात यश चोप्राच्या ‘फासले’ या चित्रपटाने केली. ‘फासले’ नंतर ती ‘मरते दम तक’, ‘नसीब अपना अपना’, ‘लव्ह 86’, ‘इमानदार’, ‘घर घर की कहानी’ अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली. पण, 2005 मध्ये लग्नानंतर फराह बॉलिवूडमधून पूर्णपणे गायब झाली.

रागीट स्वभावामुळे प्रसिद्ध

फराह इंडस्ट्रीमध्ये तिच्या रागीट स्वभावामुळे ओळखली जात होती. असं म्हणतात की, ती कधी कोणावर हात उगारेल हे सांगणे फार कठीण होते. मीडिया रिपोर्टनुसार फराहने ‘कसम वरदी की’ या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता चंकी पांडे यालादेखील मारहाणही केली होती. एवढेच नव्हे तर, जेपी दत्तांच्या पार्टीत तिने एका निर्मात्यालाही काशिलात लगावली होती.

विंदू दारा सिंहशी केले लग्न

आपल्या कारकीर्दीत यशाच्या शिखरावर असताना फराहने विंदू दारा सिंहशी लग्न केले. ती विंदूच्या प्रेमात पडली होती. जेव्हा, ती विंदूच्या प्रेमात पडली तेव्हा, ती तिच्या कारकीर्दीत यशाची चव चाखत होती. त्याचबरोबर विंदू बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमावण्याचा प्रयत्न करत होता. दारा सिंह यांना दोघांचे नाते आवडत नव्हते, पण तरीही नंतर दोघांनी लग्न केले. हे लग्न फार काळ टिकले नाही आणि 7 वर्षानंतर दोघेही विभक्त झाले.

सुमित सहगलशी बांधली लग्नगाठ

विंदू दारा सिंहपासून घटस्फोट घेतल्यानंतर फराहने सुमित सहगलशी लग्न केले. आता ती आपल्या पतीसमवेत मुंबईत राहते आणि त्याच्या डबिंग कंपनीत त्याला मदत करते. फराह आणि सुमितला एक मुलगाही आहे.

तब्बूच्या वाढदिवशी शेअर केला बालपणीचा फोटो

View this post on Instagram

A post shared by Farha Naaz (@iamfarhanaaz)

अभिनेत्री फराह नाझ ही बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे. दोन वर्षांपूर्वी तब्बूच्या वाढदिवशी फराहने त्यांच्या बालपणीचा फोटो शेअर केला होता. तब्बू आणि फराह यांच्या बालपणीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. दोघेही या बालपणीच्या फोटोंमध्ये खूप निरागस दिसत होत्या.

(Khoya Khoya Chand know about Faasle movie fame actress Farah Naaz)

हेही वाचा :

‘प्लीज आता तिसरं बाळ नको म्हणू…’, करीनाच्या हातातील अल्ट्रासाऊंडचे फोटो पाहून चाहते पडले बुचकळ्यात!

Kareena kapoor baby boy name : सैफ-करीनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव आलं समोर, ‘या’ नावाने ओळखला जाणार तैमूरचा भाऊ!

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI