Khoya Khoya Chand | वडील मिथुन चक्रवर्तींप्रमाणे स्टार बनू शकला नाही मिमोह चक्रवर्ती, छोट्या छोट्या भूमिकांमध्येच रमलाय अभिनेता!

मिमोहने ‘जिमी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तो डीजेच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटासाठी मिमोहला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते.

Khoya Khoya Chand | वडील मिथुन चक्रवर्तींप्रमाणे स्टार बनू शकला नाही मिमोह चक्रवर्ती, छोट्या छोट्या भूमिकांमध्येच रमलाय अभिनेता!
मिमोह चक्रवर्ती

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्गज स्टार्स आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवला आहे. चाहत्यांना अजूनही त्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला आवडते. पण, या सेलेब्सची मुलं मात्र स्वतःची ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरली. आज आपण अशाच एका स्टारच्या मुलाबद्दल बोलणार आहोत, जो बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट देऊ शकलेला नाही. हा अभिनेता आहे, बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा मुलगा मिमोह उर्फ ​​महाक्षय चक्रवर्ती (Mimoh Chakraborty).

मिमोहने ‘जिमी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तो डीजेच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटासाठी मिमोहला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. यानंतर, मिमोह विक्रम भट्टच्या ‘हॉन्टेड’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला. या चित्रपटात मिमोहसोबत अभिनेत्री टिया बाजपेयी मुख्य भूमिकेत दिसली होती. पण, हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला. मात्र, चित्रपटाची गाणी खूप लोकप्रिय झाली.

‘हॉन्टेड’ नंतरही मिमोहचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमत्कार करू शकला नाही. तो ‘रॉकी’, ‘लूट’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला. चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता अर्थात ‘हिरो’ म्हणून ओळख न मिळाल्यामुळे त्याने साईड रोल करायला सुरुवात केली. आता मिमोह फक्त सहायक भूमिकांमध्येच दिसत आहे.

पत्नी आहे ‘टीव्ही क्वीन’

मिमोहने अभिनेत्री मदलसा शर्माशी लग्न केले. छोट्या पडद्यावरचा सुपरहिट शो ‘अनुपमा’मध्ये मदलसा शर्मा मुख्य भूमिकेत दिसत आहे. तिच्या या खलनायकी पात्राचे नाव ‘काव्या’ असून, ती चाहत्यांना खूप आवडत आहे. मदलसाने छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप!

काही काळापूर्वी माध्यमांमध्ये मिमोहशी संबंधित एक बातमी चर्चिली जात होती. मिमोहने एका अभिनेत्रीला घरी बोलावून शीतपेयात नशा मिसळली होती. त्यानंतर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मिमोहने त्या अभिनेत्रीशी लग्न करण्याचे वचन दिले होते. पण 4 वर्षे तो टाळत राहिला. जेव्हा अभिनेत्री गर्भवती झाली, तेव्हा अभिनेत्याने तिला गोळ्या दिल्या आणि तिचा गर्भपात घडवून आणला. योगिता बालीने तिला फोन करून धमकी दिल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते. मात्र, हे प्रकरण काही काळानंतर पडद्याआड गेले.

कामाबद्दल बोलायचे तर, आता मिमोह चक्रवर्ती लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘जोगीरा सारा रा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

(Khoya Khoya Chand Mimoh Chakraborty could not become a star like his father Mithun Chakraborty)

हेही वाचा :

‘व्हेकेशन मूड’, बिकिनी परिधान करून ‘संजू बाबा’ची लाडकी त्रिशाला जंगलात डायनासोरच्या शोधात!

चित्रपट निर्माता-‘उल्लू’चा मालक विभू अग्रवालवर गुन्हा दाखल, महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI