चित्रपट निर्माता-‘उल्लू’चा मालक विभू अग्रवालवर गुन्हा दाखल, महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप

चित्रपट निर्माता विभू अग्रवाल (Vibhu Agarwal) सध्या मोठ्या अडचणीत अडल्याचे दिसत आहे. वास्तविक, मुंबई पोलिसांनी विभू अग्रवालविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चित्रपट निर्माता-‘उल्लू’चा मालक विभू अग्रवालवर गुन्हा दाखल, महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप
विभू अग्रवाल

मुंबई : चित्रपट निर्माता विभू अग्रवाल (Vibhu Agarwal) सध्या मोठ्या अडचणीत अडल्याचे दिसत आहे. वास्तविक, मुंबई पोलिसांनी विभू अग्रवालविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विभूवर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला असून पोलिसांनी भादंविच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विभू व्यतिरिक्त त्याच्या कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैनावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभू यांची ‘उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी आहे. ही कंपनी प्रौढ सामग्री तयार करण्यासाठी ओळखली जाते. 2013 मध्ये विभू अग्रवाल यांनी ‘बात बन गई’ या बॉलिवूड चित्रपटाची निर्मिती केली. 2018 मध्ये त्यांनी ‘उल्लू’ अॅप लाँच केले. या अॅपवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, भोजपुरी, बंगाली, पंजाबी, मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि गुजराती भाषांमध्येही कार्यक्रम प्रसारित केले जातात.

गुन्हा दाखल

या प्रकरणात, मुंबई पोलीस म्हणतात, ‘पोलिसांनी फिल्म प्रोडक्शन कंपनी उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ विभू अग्रवाल यांच्यावर मुंबईतील आयपीसीच्या कलम 354 अंतर्गत एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विभू अग्रवाल यांच्यासह त्यांच्या कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैनावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 ऑगस्ट 2021 रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशय बदलल्याची चर्चा होती

विभूची ‘उल्लू’ ही कंपनी अश्लील आणि प्रौढ सामग्री तयार करण्यासाठी चर्चेत आहे. दरम्यान, या वर्षी मेमध्ये ई टाइम्सशी बोलताना, विभू अग्रवाल यांनी उल्लू प्लॅटफॉर्मची सामग्री कौटुंबिक सामग्रीमध्ये बदलण्याविषयी बोलले होते.

अॅपवर कौटुंबिक सामग्री टाकायची होती!

विभू म्हणाले होते की, आम्हाला उल्लूबद्दल लोकांची धारणा बदलायची आहे. म्हणूनच आम्ही ठरवले आहे की आम्ही अॅपवरील 60 टक्के सामग्री कौटुंबिक सामग्रीमध्ये रूपांतरित करू. जर तुम्ही उल्लू हे नाव घेतले तरी लोकांच्या मनात एकच विचार येतो तो म्हणजे प्रौढ चित्रपट. आमचेही एक कुटुंब आहे आणि आम्हाला ते बदलायचे आहे.’

त्याचवेळी, विभूनेही स्पष्टपणे सांगितले होते की, आम्ही असे चित्रपट करण्यासाठी कोणावरही दबाव आणत नाही. जर कोणी शूट करू इच्छित नसेल, तर आणखी 4 लोक ते करण्यासाठी प्रतीक्षा करत असतात.

(Filmmaker Ullu owner Vibhu Agarwal charged woman accused of sexual harassment)

हेही वाचा :

Top 5 News | ‘हम आपके हैं कौन’एव्हरग्रीन चित्रपटाची 27 वर्षे ते रितेश देशमुखने सांगितलं बायकोचं खरं नाव, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी

‘मुघल-ए-आझम’च्या निर्मितीवर खर्च झाला पाण्यासारखा पैसा, तिकिटासाठीही चार दिवस रांगेत उभे होते प्रेक्षक!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI