Khoya Khoya Chand | सलमान खानची पत्नी बनल्यानंतरही नाही चमकली शीबा साबीरची कारकीर्द, इंडस्ट्रीपासून दूर जगतेय सुखी आयुष्य!

Harshada Bhirvandekar

| Edited By: |

Updated on: Aug 20, 2021 | 7:49 AM

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आले, ज्यांनी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर या मनोरंजन विश्वाचा निरोप घेतला. अभिनेत्री शीबा आकाशदीप साबीरचे (Sheeba Akashdeep Sabir)  नावही या यादीत सामील आहे.

Khoya Khoya Chand | सलमान खानची पत्नी बनल्यानंतरही नाही चमकली शीबा साबीरची कारकीर्द, इंडस्ट्रीपासून दूर जगतेय सुखी आयुष्य!
शीबा सबीर
Follow us

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आले, ज्यांनी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर या मनोरंजन विश्वाचा निरोप घेतला. अभिनेत्री शीबा आकाशदीप साबीरचे (Sheeba Akashdeep Sabir)  नावही या यादीत सामील आहे. शीबाने सलमान खानसोबत त्याच्या ‘सूर्यवंशी’ (Suryavanshi) या चित्रपटात काम केले होते. पण आता ही अभिनेत्री चित्रपट जगताचा निरोप घेऊन आपल्या कौटुंबिक जीवनात व्यस्त झाली आहे. शीबाला दोन मुलगे आहेत.

शीबाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तमिळ चित्रपटांपासून केली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने 1991मध्ये आलेल्या ‘ये आग कब बुझेगी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण, अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केल्यानंतरही शीबा बॉलिवूडमध्ये काही विशेष जादू दाखवू शकली नाही.

सलमानसोबतच्या चित्रपटामुळे चर्चेत…

सलमान खान (Salman Khan) याच्यासोबत ‘सूर्यवंशी’ चित्रपट केल्यानंतर शीबाचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पण ही प्रसिद्धी फार काळ टिकली नाही. या चित्रपटात शीबाने सलमान खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. परंतु काही चित्रपटांनंतर अभिनेत्री मनोरंजन विश्वातून पूर्णपणे गायब झाली. शीबा ने ‘प्यार का साया’, ‘मिस्टर बॉण्ड’, ‘हम है कमल के’, ‘तीसरा कौन’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तरीही अभिनेत्रीला कोणतेही यश मिळाले नाही. अभिनेत्री शेवटची 2015मध्ये आलेल्या ‘हम बाजा बजा देंगे’ या चित्रपटात दिसली होती.

छोट्या पडद्यावरही आजमावले नशीब

चित्रपटांना अलविदा म्हटल्यानंतर अभिनेत्री छोट्या पडद्याकडे वळली. त्यानंतर तिने अनेक टीव्ही शोमध्ये सातत्याने काम केले. पण छोट्या पडद्यावरही ती फारशी कमाल दाखवू शकली नाही. शीबा सुरुवातीपासूनच मुंबईत राहिली आहे. शीबाने हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दिग्दर्शकाशी बांधली लग्नगाठ

1996मध्ये शीबाने फिल्ममेकर आकाशदीपसोबत लग्न केले. तिच्या एका चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघांनी काही महिने एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न केले. आकाशदीपने शीबाच्या काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आले आहेत,ज्यांना इंडस्ट्रीमध्ये फारसे यश न मिळाल्याने आणि करिअर न झाल्याने, त्यांनी बॉलिवूडशी असलेले नाते कायमस्वरूपी तोडले आहे. शीबा व्यतिरिक्त, असे इतर बरेच कलाकार आहेत, जे आता या इंडस्ट्रीचा भाग नाहीत.

हेही वाचा :

‘पालेकरांसोबत काम करणं अद्भुत अनुभव’ अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या भावना

अवनीला वाचवताना अंजीला ट्रकने उडवलं, शुद्धीवर आल्यावर पती म्हणून तिने दुसऱ्याचं नाव घेतलं!

कोट्यवधींची मालकीण स्वरा भास्कर, एका चित्रपटासाठी आकारते तगडे मानधन!

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI