AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाविषयी मित्राने केला धक्कादायक खुलासा

करण जोहरच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वी कियारा आणि शाहिद कपूर आले होते.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाविषयी मित्राने केला धक्कादायक खुलासा
| Updated on: Nov 30, 2022 | 4:04 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून ​​एकमेकांना डेट करत आहेत. सतत चर्चा आहेत की, कियारा आणि सिद्धार्थ लवकरच लग्न बंधणात अडकणार आहेत. चाहतेही यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या जोडीला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळते आहे. करण जोहरच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वी कियारा आणि शाहिद कपूर आले होते. त्यावेळी शाहिदने सांगितले होते की, नव्या वर्षामध्ये कियारा तुम्हाला सर्वांना खूप मोठे गिफ्ट देणार आहे. विशेष म्हणजे हे तिच्या चित्रपटाविषयी नसून खासगी आयुष्याबद्दलचे आहे, तेंव्हापासूनच कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत.

जानेवारी महिन्यामध्ये कियारा आणि सिद्धार्थ लग्न करणार असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये आहेत. मात्र, नुकताच या दोघांच्या अत्यंत जवळच्या मित्राने यांच्या लग्नाविषयी मोठी अपडेट दिली आहे.

कियारा अडवाणी तिच्या करिअरमध्ये अत्यंत महत्वाच्या टप्प्यामध्ये आहे. कियाराला वाटते की, लग्न झाल्यावर कुठेतरी यासर्व गोष्टी मागे पडतील. यामुळे सध्यातरी कियाराने लग्नाचा विषय बाजूला ठेवला असल्याचे तिच्या मित्राने सांगितले आहे.

दोघांपैकी कोणीही लग्नाविषयी विचार करत नसल्याचे देखील सांगण्यात आले आहे. लग्नानंतर कियाराच्या करिअरला ब्रेक लागू शकतो असेही कियाराला वाटत असल्याचे तिच्या मित्राने सांगितले आहे.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या चाहत्यांना या दोघांच्या लग्नासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. कियारा गोविंदा नाम मेरा या चित्रपटात लवकरच दिसणार असून या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल