Jug Jugg Jeeyo | जुग जुग जिओ चित्रपटाची पहिल्या दिवशी इतकी कमाई, वरुण कियाराची जोडी हिट!

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन शेअर केले आहे. त्यांच्या पोस्टनुसार, शुक्रवारी 24 जून रोजी 'जुग जुग जिओ'ने 9.28 कोटी रुपयांची कमाई केलीयं. सकाळपेक्षा संध्याकाळचे शो जास्त कमाई केली. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करावी लागणार हे निश्चित.

Jug Jugg Jeeyo | जुग जुग जिओ चित्रपटाची पहिल्या दिवशी इतकी कमाई, वरुण कियाराची जोडी हिट!
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 25, 2022 | 1:52 PM

मुंबई : अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांचा स्टारर चित्रपट ‘जुग जुग जिओ’ (Jug Jugg Jeeyo) शुक्रवारी प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये चांगली सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 9.28 कोटी रुपयांची कमाई केली. दिग्दर्शक राज मेहता यांचा हा चित्रपट (Movies) वैवाहिक जीवनावर आधारित आहे. जुग जुग जिओचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) पृथ्वीराज आणि आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी पेक्षा कमीच होते. ज्याची ओपनिंग सुमारे 10.50 कोटी रुपये होती.

तरण आदर्श यांनी केलेले ट्विट

जुग जुग जिओ’ने पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन शेअर केले आहे. त्यांच्या पोस्टनुसार, शुक्रवारी 24 जून रोजी ‘जुग जुग जिओ’ने 9.28 कोटी रुपयांची कमाई केलीयं. सकाळपेक्षा संध्याकाळचे शो जास्त कमाई केली. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करावी लागणार हे निश्चित. वीकेंडला चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन, कियारा अडवाणी महत्वाच्या भूमिकेत

‘जुग जुग जिओ’ हा एक कौटुंबिक मनोरंजन चित्रपट आहे. आपण आपल्या फॅमिलीसोबत हा चित्रपट बघायला जाऊ शकता. जो विवाहित जीवनातील समस्या दाखवतो. अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन, कियारा अडवाणी यांच्याशिवाय या चित्रपटात मनीष पॉल आणि प्राजक्ता कोहली यांच्याही भूमिका आहेत. राज मेहताने या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. जुग जुग जियो या चित्रपटाच्या सेटवर काही लोकांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे काही दिवस चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें