AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

36 वर्षांपूर्वी एका गाण्यामुळे अनेक पुरुषांना भोगावा लागलेला तुरुंगवास, हैराण करणारं कारण; पण गाणं आजही तुफान हिट

झगमगत्या विश्वातील अनेक असे किस्से आहेत जे, अनेक वर्षांनंतर समोर आले. 36 वर्षांपूर्वी एक गाणं प्रदर्शित झालेलं, पण त्या गाण्यामुळे अनेक पुरुषांना तुरुंगवास भोगावा लागलेला, जाणून घ्या तेव्हा नक्की काय झालेलं.

36 वर्षांपूर्वी एका गाण्यामुळे अनेक पुरुषांना भोगावा लागलेला तुरुंगवास, हैराण करणारं कारण; पण गाणं आजही तुफान हिट
| Updated on: May 17, 2026 | 11:58 AM
Share

बॉलिवूडचे काही जुने सिनेमे आणि गाणी आज चाहत्यांच्या आवडीचे आहेत. पूर्वी गाणी आणि सिनेमे हीट व्हायचे पण, सिनेमा – गाण्यांमुळे काय – काय घडलं आहे, हे फार कोणाला माहिती नव्हतं. काहींच्या मागे तर अनेक मजेदार किस्से आहे. जे एका काळानंतर समोर आले, ज्यामुळे कळलं की, एका गाण्यामुळे देखील एवढं काही होऊ शकेल… 36 वर्षांपूर्वी असं एक गाणं प्रदर्शित झालेलं, ज्यामुळे अनेक पुरुषांना तुरुंगवास भोगावा लागलेला… महत्त्वाची गोष्य म्हणजे, ते गाणं आजही तूफान हीट आहे… आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, ते होणतं गाणं आहे आणि गाण्यामुळे एवढं काय झालेलं ज्यामुळे देशातील अनेक पुरुषांना तुरुंगात जावं लागलं. तर जाणून घ्या त्या सिनेमाबद्दल आणि सुपरहीट गाण्याबद्दल…

सध्या चर्चा सुरु आहे 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका सिनेमाची सिनेमाचं नाव आहे ‘त्रिदेव’, या सिनेमात एक – दोन नाही तर, अनेक सुपरस्टार होते… तर ‘त्रिदेव’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राजीव राय यांच्या खांद्यावर होती. त्रिदेव सिनेमात नसीरुद्दीन शाह, सनी देओल, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, संगिता बिजलानी, सोनम, अनुपण खेर, अमरीश पुरी यांसारखे दिग्गज कलाकार होते.

सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई केली आणि सिनेमा हिंदी सिनेविश्वात तिसरा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला. ‘त्रिदेव’ सिनेमा एक दोन नाही तीन फिल्मफेयर पुरस्कार देखील जिंकले… पण सिनेमातील एका गाण्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. गाण्यामुळे देशभरातील अनेक पुरुषांना अटक देखील करण्यात आली होती.

दिग्दर्शक राजीव राय यांनी एका मुलाखतीत सांगितल्या नुसार, 90 च्या दशकात प्रदर्शित झालेलं ‘ओए ओए’ गाणं बॅन तर झालं नाही. पण गाण्याची बदनामी नक्कीच झाली. संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी ‘ओए ओए’ गाण्याचा उपयोग छेडछाड करण्यासाठी होऊ लागला. ज्यामुळे अनेकांना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा या गाण्यामुळे वाद निर्माण झालेला.

पण आजही हे गाणं तुफान हीट आहे. गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘त्रिदेव’ सिनेमातील हे गाणं ग्लोरिया एस्टेफनचं ग्लोबल हीट गाणं ‘रिदम इंज गोना गेट यू’च्या प्रेरणेतून तयार करण्यात आलं. गाण्याला कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांनी आवज दिलेला.

Follow Us
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या, व्हिडिओवर नेटकरी फिदा
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
Roha Accident | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...