AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिची मैत्रीण घरी येत नाही..; घटस्फोटानंतर मुलीचा एकटाच सांभाळ करणाऱ्या अभिनेत्याचा खुलासा, ऐकून परिणीतीलाही बसला धक्का

अभिनेता इम्रान खानने नुकतेच आपल्या मुलीबद्दल भाष्य केले. परिणीती चोप्राच्या शोमध्ये इम्रानने खुलासा केला की, त्याची मुलगी इमाराच्या मैत्रिणी तिच्याशी घरी खेळायला येत नाही. घरात फक्त अविवाहित पुरुष असल्यामुळे, त्यांची आई त्यांना येऊ देत नाही.

तिची मैत्रीण घरी येत नाही..; घटस्फोटानंतर मुलीचा एकटाच सांभाळ करणाऱ्या अभिनेत्याचा खुलासा, ऐकून परिणीतीलाही बसला धक्का
| Updated on: May 17, 2026 | 12:09 PM
Share

अभिनेता इम्रान खान हा त्याच्या मुलीचा एकटाच सांभाळ करतो. पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतरही ते को-पॅरेटिंग करतात. तो अनेकदा मुलीच्या पालनपोषणाबद्दल खुलेपणाने बोलत असतो. अभिनेत्री परिणीती चोप्राच्या ‘मॉम टॉक्स’ या शोमध्ये तो नुकताच आला होता. त्या संभाषणादरम्यान, एकट्याने पालकत्व निभावण्यातील आव्हानांविषयी तो मनमोकळेपणाने बोलला. त्याची पूर्व पत्नी अवतिंकासोबत तो मुलीचे को-पॅरेटिंग करतो आणि त्यांची मुलगी आठवड्यातून 3-4 दिवस त्याच्यासोबत राहते. मात्र जेव्हा इमारा घरी असते, तेव्हा तिच्या मैत्रिणींच्या आया आपल्या मुलींना तिच्यासोबत खेळायला पाठवायला कचरतात, कारण घरात कोणी स्त्री नसते, असा खुलासा त्याने नुकताच केला.

या संभाषणादरम्यान इम्रानने सांगितलं की, जेव्हा त्याची मुलगी त्याच्यासोबत असते, तेव्हा तिच्या मैत्रिणी आणि त्यांच्या पालकांसोबत खेळण्याचं वेळापत्रक ठरवणं अवघड जातं. तो म्हणाला, “मी पूर्वी नियोजन करण्याचा प्रयत्न करायचो. ‘माझ्या मैत्रिणीला विचाराल का, ती खेळायला घरी येऊ शकेल का?’ असं इमारा मला विचारायची. मग मी त्यांचा नंबर शोधायचो आणि तिच्या आईच्या मैत्रिणीला मेसेज करायचो: ‘ अमुक-तमुक (तुमची मुलगी), खेळायला घरी येऊ शकेल का?’ आणि त्यावर त्यांचं उत्तर यायचं, ‘सॉरी, आज शक्य नाही.’ पुढच्या आठवड्यात मी पुन्हा विचारायचो: ‘हॅलो, आम्ही येऊ शकतो का?’ त्या पुन्हा म्हणायच्या, ‘नाही, आज नाही.’ असा अनुभव इम्रानने सांगितला.

घरी मुलांना खेळायला पाठवायला कचरतात

मग त्याला हळूहळू जाणवत असलेल्या एका गोष्टीबद्दल त्याने विचार केला. इम्रान खान पुढे म्हणाला, “नंतर माझ्या लक्षात आलं की, काही मातांना आपलं बाळ, विशेषतः मुलगी असेल, अशा घरी पाठवणं सोयीचं वाटत नाही जिथे फक्त एकच पुरुष आहे. मी एक पुरुष आहे आणि वडीलही आहे, पण आता माझा घटस्फोट झाल्यामुळे घरात कोणतीही स्त्री नाही.” असं त्याने नमूद केलं. आपण अशा माणसांनी भरलेल्या जगात राहतो. हा विचार कुठून येतो हे तुम्ही समजू शकता. ते खूप हृदयद्रावक होतं, कारण मला माझ्या मुलीला दर आठवड्याला सांगावं लागायचं, “सॉरी, आज तुझी मैत्रीण येऊ शकत नाही.” असं इम्रान म्हणाला.

परिणिती झाली हैराण

इम्रानचं हे बोलणं ऐकून परिणीती चोप्रा हैराण झाली. ” जर हीच गोष्ट एखाद्या एकल पालकासोबत घडली असती, (मी त्यांना ‘एकल आई’ म्हणणारही नाही, फक्त ‘पालक’ म्हणेन), तर त्यांना ही अडचण आली असती, असं मला वाटत नाही. खरं तर, लोकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली असती. त्यांना वाटलं असतं, ‘अरे, एखादी आई फोन करत्ये, मी माझ्या मुलीला खेळायला पाठवायला हवं.’  पण सिंगल असलेले वडील असं काही करू शकत नाहीत”, असं म्हणत परिणीतीने आश्चर्य व्यक्त केलं.

सिंगल पुरूषाला कोणी सपोर्ट करत नाही

याबद्दल बोलताना पुढे इम्रान म्हणाला, ” म्हणून मला वाटतं की हे एक असं क्षेत्र आहे जिथे कदाचित माता एकत्र येऊन पाठिंबा देऊ शकतात आणि म्हणू शकतात, ‘अगं, तू एकटी आई आहेस, आम्ही तुझ्याकडे येऊ, आम्ही तुला मदत करू.” पण सिंग पुरूषांना, वडीलांना असा सपोर्ट मिळत नाही. ” पुरुष बलवान असतात, पुरुष तसे नसतात.” सर्व पुरुषांना पुरुषत्वाची एक मर्यादित संकल्पना शिकवली जाते, असं त्याने पुढे नमूद केलं.

त्यामुळे, तुमच्या काही अधिक संवेदनशील भावनांकडे दुर्लक्ष केले जाते, याउलट एका स्त्रीला दोन-तीन मैत्रिणी असतात ज्या तिला भावनिक आधार देतात आणि पाठिंबा देतात. दुर्दैवाने, पुरुषांना अनेकदा सांगितलं जातं, “अरे, मर्द बन, कमजोर होऊ नकोस.”

इम्रानचं लग्न आणि घटस्फोट

अभिनेता इम्रान खानने 2011 साली अवंतिका मलिकशी लग्न केले. जून 2014 साली या जोडप्याला इमारा नावाची मुलगी झाली. आठ वर्षे एकत्र राहिल्यानंतर, मतभेदांमुळे ते वेगळे झाले. 2024 मध्ये इम्रानने लेखा वॉशिंग्टनसोबतच्या आपल्या नात्याची जाहीरपणे पुष्टी केली.

Follow Us
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या, व्हिडिओवर नेटकरी फिदा
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
Roha Accident | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी, म्हणाल्या...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दरोडा...
रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?; दोन दिवस रुग्णालयात...
Ramesh Mhatre Case | दोन दिवस रुग्णालयात उपचार...आता थेट कोर्टात!; रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?