Kiara Advani | कियारा अडवाणीने शेअर केला टॉपलेस फोटो, पाहून आलिया भट्ट म्हणाली…

अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्याच्या दिवसांमध्ये मुख्य चर्चेचा एक भाग बनली आहे. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कियारा सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. तिची ग्लॅमरस शैलीला चाहत्यांना देखील खूप आवडते.

Kiara Advani | कियारा अडवाणीने शेअर केला टॉपलेस फोटो, पाहून आलिया भट्ट म्हणाली...
कियारा अडवाणी

मुंबई : अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्याच्या दिवसांमध्ये मुख्य चर्चेचा एक भाग बनली आहे. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कियारा सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. तिची ग्लॅमरस शैलीला चाहत्यांना देखील खूप आवडते. कियाराने सोशल मीडियावर नुकताच तिचा एक टॉपलेस फोटो (Topless Photoshoot) शेअर केला आहे, जो पाहून केवळ तिचे चाहतेच नाही तर बॉलिवूड सेलेब्सदेखील घायाळ झाले आहेत (Kiara Advani share topless photoshoot on social media).

अभिनेत्री कियारा अडवाणी हिने पुन्हा एकदा फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केले आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत कियारा फोटोसाठी जबरदस्त पोझेस देताना दिसत आहे. फोटोमध्ये ती वाळूवर पहूडलेली दिसत आहे आणि तिने या फोटोशूटसाठी सटल मेकअप देखील केला आहे.

पाहा कियाराचा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कियाराच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट देखील कियाराच्या या जबरदस्त फोटोवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकलेली नाही. तिने कमेंट करत म्हटले की, ‘वाह… ‘ तर डब्बू रत्नानी यांनी देखील कमेंट केली की, ‘ब्युटी…’

गेल्या वर्षीही कियाराने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. तिने हातात एक मोठे पान पकडून केलेले न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. कियाराचा हा लूक चाहत्यांना चांगलाच आवडला होता.

डब्बू रत्नानी गेल्या आठवड्यापासून 2021च्या कॅलेंडरची छायाचित्रे शेअर करत आहेत. नुकताच त्यांनी सनी लिओनीचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सनी फक्त एक कपडा पकडून उभी दिसत आहे. सनीचे हे फोटोशूट खूप व्हायरल होत आहे. याशिवाय डब्बू रत्नानी यांनी विक्की कौशल आणि अभिषेक बच्चन यांचे फोटोही शेअर केले आहेत.

रणवीर सिंहसोबत झळकणार!

कियारा अडवाणी सध्या चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती बनली आहे. ती लवकरच रणवीर सिंहसोबत काम करताना दिसणार आहे. ती साऊथच्या ‘अ‍न्नियन’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये कियारा अडवाणी अभिनेता रणवीर सिंह सोबत दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाविषयी आणि कास्टबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, कियारा अडवाणी लवकरच अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर ‘भूलभुलैया 2’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती वरुण धवन, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्यासमवेत ‘जुग जुग जिओ’ चित्रपटातही दिसणार आहे. कियारा अखेर अक्षय कुमारसमवेत ‘लक्ष्मी’ या चित्रपटात दिसली होती.

(Kiara Advani share topless photoshoot on social media)

हेही वाचा :

Anushka Sen | अभिनेत्री अनुष्का सेनला कोरोनाची लागण, ‘खतरों के खिलाड़ी’वर स्थगितीचे सावट!

Kareena Kapoor Net Worth | बंगले आणि महागड्या गाड्या, पाहा ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे करीना कपूर!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI