Anushka Sen | अभिनेत्री अनुष्का सेनला कोरोनाची लागण, ‘खतरों के खिलाड़ी’वर स्थगितीचे सावट!

कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’चे शूटिंग सध्या केपटाऊनमध्ये सुरू आहे. मात्र, आता रोहित शेट्टीचा प्रसिद्ध शो ‘खतरों के खिलाडी 11’च्या (Khatron Ke Khiladi 11) सेटवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शोची स्पर्धक अनुष्का सेन (Anushka Sen) हिला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Anushka Sen | अभिनेत्री अनुष्का सेनला कोरोनाची लागण, ‘खतरों के खिलाड़ी’वर स्थगितीचे सावट!
अनुष्का सेन
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jun 17, 2021 | 10:55 AM

मुंबई : कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’चे शूटिंग सध्या केपटाऊनमध्ये सुरू आहे. मात्र, आता रोहित शेट्टीचा प्रसिद्ध शो ‘खतरों के खिलाडी 11’च्या (Khatron Ke Khiladi 11) सेटवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शोची स्पर्धक अनुष्का सेन (Anushka Sen) हिला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे (Khatron Ke Khiladi 11 fame contestant Anushka Sen tested corona positive).

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, या शोची सर्वात लहान स्पर्धक अभिनेत्री अनुष्का सेनला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, या सगळ्यात अशीही एक बातमी समोर येत आहे की, सध्या अनुष्का सेनला कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे नसून, केवळ तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता या बातमीने शोच्या उर्वरित स्पर्धकांमध्ये खळबळ माजली आहे.

कोरोनामुळे सेटवर उडाली खळबळ

अनुष्का सेनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच, या अभिनेत्रीला अलगिकरणात ठेवण्यात आले आहे. अनुष्काचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता या शोच्या उर्वरित स्पर्धकांचीही कोरोनासाठी टेस्ट करण्यात आली आहे. बातमीनुसार अनुष्का वगळता इतर सर्व स्पर्धकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

सर्व प्रकारची काळजी घेतल्यानंतरही अनुष्का सेन कोरोनाची बळी ठरली आहे. यामुळे निर्मात्यांची चिंता वाढली आहे. आता असे दिसते आहे की, रोहित शेट्टीचा टीव्ही रिअ‍ॅलिटी शो धोक्यात आला आहे.

अनुष्का शोमधून बाहेर पडल्याच्या बातम्या

अलीकडेच एक बातमी समोर आली होती की, अनुष्काला शोमधून एलीमिनेट करण्यात आले आहे. मात्र, त्यावर पुष्टी झाली नव्हती. बातमी अशी होती की, अनुष्कासोबत आणखी 4 जणांची नावे एलिमिनेशनमध्ये आली आहेत. या हंगामाच्या निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे की, स्पर्धक एलिमिनेट झाले तरी ते घरी जाणार नाहीत, कारण त्या स्पर्धकांना पुन्हा वाईल्ड कार्ड एंट्रीने बोलावल्यास ते तिथेच राहतील. मात्र, आता अनुष्काला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे असे दिसते आहे की, या कारणामुळे अभिनेत्रीला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.

काही काळापूर्वीच सर्व सेलेब्स या शोच्या शूटिंगसाठी केपटाऊनला पोहोचले होते. या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये राहुल वैद्य, निक्की तांबोळी, अभिनव शुक्ला, सौरभ राज जैन, आस्था गिल, सना मकबूल, मेहक चहल, वरुण सूद, दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी आणि विशाल आदित्य सिंह हे कलाकार सहभागी झाले आहेत.

(Khatron Ke Khiladi 11 fame contestant Anushka Sen tested corona positive)

हेही वाचा :

Kareena Kapoor Net Worth | बंगले आणि महागड्या गाड्या, पाहा ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे करीना कपूर!

अभिनेत्याशी लग्न करून थाटला संसार, जाणून घ्या सध्या काय करतेय ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानी…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें