AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तू बेस्ट बॉयफ्रेंड आहेस…’, सुशांतच्या पुण्यतिथीनंतर अंकिता लोखंडेचे विक्की जैनसाठी सुंदर पत्र!

टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने नुकतेच दिवंगत सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्याची आठवण म्हणून इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या होत्या. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी आता अंकिताने तिचा प्रियकर विक्की जैनसाठी (Vikki Jain) एक लांबलचक गोंडस पोस्ट शेअर केली आहे.

‘तू बेस्ट बॉयफ्रेंड आहेस...’, सुशांतच्या पुण्यतिथीनंतर अंकिता लोखंडेचे विक्की जैनसाठी सुंदर पत्र!
अंकिता-विक्की
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 10:34 AM
Share

मुंबई : टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने नुकतेच दिवंगत सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्याची आठवण म्हणून इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या होत्या. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी आता अंकिताने तिचा प्रियकर विक्की जैनसाठी (Vikki Jain) एक लांबलचक गोंडस पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच तिने एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात दोघेही हसून एकमेकांच्या डोळ्यात पाहताना दिसत आहेत. अंकिताची ही पोस्ट खूप व्हायरल झाली असून, लोक या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत (Ankita Lokhande share cute post for boy friend Vikki Jain after sushant first death anniversary).

अंकिता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलक इन्स्टाग्रामवर चाहत्यांसमवेत शेअर करते. विक्की जैनसाठी अंकिताने हे पहिल्यांदाच लिहिलेले नाही. याआधीही तिने प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकदा सोशल मीडियाची मदत घेतली आहे.

पाहा पोस्ट :

असा होता अंकिताचा लूक

अंकिताने विक्की जैनबरोबर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. यावेळी अतिशय पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. तर सोबत उभा असलेला विक्कीदेखील व्हाईट आऊटफिटमध्ये दिसला आहे.

कठीण काळातही एकत्र राहिले विक्की-अंकिता

विक्कीबद्दल तिचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करताना अंकिता लोखंडे कॅप्शनमध्ये लिहिते, ‘प्रिय विक्की – माझ्या कठीण काळापासून ते आतापर्यंत तू माझ्याबरोबर आहेस. मी कशी आहे, कोणत्याही गोष्टीची मदत हवी आहे किंवा मनाला फ्रेश ठेवण्यासाठी आणि याशिवाय इतर बर्‍याच गोष्टींची काळजी करणारा पहिला व्यक्ती तू आहेस. तू माझ्यासाठी नेहमीच काळजीत असतोस. मी नेहमीच तुझ्या सगळ्या प्रश्नांना होय म्हणते! मी ठीक आहे, कारण मला माहित आहे की तू माझ्याबरोबर आहेस.’

तू बेस्ट बॉयफ्रेंड आहेस!

विक्कीचे सर्वोत्कृष्ट प्रियकर म्हणून वर्णन करताना अंकिता पुढे लिहिते, ‘मला तुझे आभार मानायचे आहेत, कारण तू जगातील सर्वोत्कृष्ट प्रियकर आहेस. मला काय हवे आहे ते सांगण्याची तुला कधीही आवश्यकता लागत नाही. कारण, माझी निवड-गरज तुला आधीच समजते. खूप व्यस्त असतानाही माझ्यासाठी वेळ काढल्याबद्दल, माझ्या कुटूंबाशी मैत्री करण्यासाठी आणि मित्रांसोबत हँगआउट करण्यासाठी खूप खूप आभार!’

नेहमीच आपले वचन पाळले!

प्रत्येक लहान गोष्ट अंकितासाठी खूप अर्थपूर्ण असते. तिच्या आयुष्यातील बर्‍याच चढउतारांबद्दल बोलताना ती पुढे लिहिते, ‘आम्ही बरेच चढ-उतार एकत्र पाहिले आहेत. तू वचन दिलेस की, एक दिवस सर्व काही ठीक होईल आणि तू नेहमीच आपले वचन पूर्ण केलेस आणि मला मदत केलीस. यासाठी मी नेहमीच तुझी आभारी राहीन. हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक वर्ष होते आणि मला माहित होते की, तू माझ्या पाठीशी उभा आहेस. तुझ्याशिवाय मी काय करेन, हे मला माहित नाही. मी तुझ्यावर अजून जास्त प्रेम करायला लागले आहे.’

स्वत:ला भाग्यवान समजते अंकिता!

अंकिता पुढे लिहिते, गेल्या काही वर्षात मी बर्‍याच अडचणीतून गेले आहे. माझे हृदय तुटले आहे, हे मला माहित आहे किंवा मी यापुढे कधीही आनंदी होणार नाही, हे देखील मला माहित आहे. एके दिवशी मी तुला भेटले, तू हा विश्वास व्यक्त केला आणि तू नेहमी माझ्याबरोबर आहेस याची जाणीव करुन दिली. आम्ही दोघे प्रेमात पडलो आणि त्यानंतर कधीच निराश झालो नाही. माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला जगातील सर्वात भाग्यवान मुलगी बनवल्याबद्दल धन्यवाद. मला एक चांगली व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल आणि तुझ्या प्रेमाबद्दल धन्यवाद!’

(Ankita Lokhande share cute post for boy friend Vikki Jain after sushant first death anniversary)

हेही वाचा :

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांशी अफेअरची चर्चा, स्टारडम अनुभवल्यानंतर अचानक का गायब झाली आयेशा जुल्का?

Video | …जेव्हा विराटचे गाणे ऐकून अनुष्का शर्माच्या डोळ्यांत अश्रू तरळतात, पाहा व्हिडीओ

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.