Video | …जेव्हा विराटचे गाणे ऐकून अनुष्का शर्माच्या डोळ्यांत अश्रू तरळतात, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli)  यांची स्वप्नवत प्रेमकथा कोणीच विसरू शकत नाही. यावर्षी कन्या वामिकाचे स्वागत करणाऱ्या या जोडप्याने इटलीमध्ये 2017मध्ये एका खासगी कार्यक्रमात लग्न गाठ बांधली होती. हा लग्न सोहळा अतिशय खाजगी आणि कॅमेरापासून दूर होता.

Video | ...जेव्हा विराटचे गाणे ऐकून अनुष्का शर्माच्या डोळ्यांत अश्रू तरळतात, पाहा व्हिडीओ
'विरुष्का'


मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli)  यांची स्वप्नवत प्रेमकथा कोणीच विसरू शकत नाही. यावर्षी कन्या वामिकाचे स्वागत करणाऱ्या या जोडप्याने इटलीमध्ये 2017मध्ये एका खासगी कार्यक्रमात लग्न गाठ बांधली होती. हा लग्न सोहळा अतिशय खाजगी आणि कॅमेरापासून दूर होता. मात्र, लग्न सोहळा पार पडल्यानंतर याचे बरेच फोटो आणि व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर चर्चेत आले (Anushka Sharma was left in tears as Virat Kohli sang this song for her).

या सोहळ्यात एक खूप खास गोष्ट होती, ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या पत्नीसाठी अर्थात  अनुष्कासाठी गायलेले गाणे. या चर्चित व्हिडीओमध्ये विराट अनुष्काचे कौतुक करण्यासाठी त्याच्या कुटुंब आणि मित्रांसमोर ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ हे गाणे गात आहेत. या व्हिडीओत एक क्षण असा आला, जेव्हा विराटने तिच्यासाठी हे गाणे समर्पित केल्याने भावनिक झालेल्या अनुष्काचा चेहरा टिपण्यासाठी कॅमेरा थांबला आहे.

पाहा व्हिडीओ

‘विरुष्का’ या प्रेमी जोडप्याने डिसेंबर 2017मध्ये इटलीमध्ये एका खासगी सोहळ्यात लग्न गाठ बांधली. यावर्षी जानेवारी महिन्यात अनुष्काने एका मुलीला जन्म दिला आणि तिचे नाव ‘वामिका’ ठेवले.

अनुष्का शर्माने ‘रब ने बन दी जोडी’ या चित्रपटाद्वारे अभिनेता शाहरुख खान सोबत मनोरंजन विश्वात पदार्पण केले. तिने ‘सुलतान’, ‘बँड बाजा बारात’, ‘दिल धड़कने दो’, ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘सुई धागा’ आणि बर्‍याच चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून कामगिरी सिद्ध केली. तिचा भाऊ कर्णेश शर्मा यांच्यासमवेत तिने 2013मध्ये लाँच केलेल्या ‘क्लीन स्लेट फिल्म्स’च्या बॅनरखाली अनुष्काने ‘एनएच 10’, ‘परी’ आणि ‘फिल्लौरी’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

गेल्या दोन वर्षांत तिच्या प्रोडक्शन हाऊसने ओटीटीसाठी ‘पाताल लोक’ आणि ‘बुलबुल’सारख्या वेबसीरीज निर्मित केल्या आहेत. 2018 नंतर अनुष्काने कामातून ब्रेक घेतला होता. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सीरीजमध्ये भारत खेळत असल्याने अनुष्का आणि मुलगी वामिका या दोघी विराट कोहलीसमवेत इंग्लंडमध्ये रवाना झाल्या आहेत.

(Anushka Sharma was left in tears as Virat Kohli sang this song for her)

हेही वाचा :

Anushka Sharma Tea Controversy | ‘अनुष्का शर्माला चहा सर्व्ह केला’, फारुख इंजिनिअर यांच्या वक्तव्यावर दोन वर्षांनी एमएसके प्रसाद यांची प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले…

Photo : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI