Love Story | आईमुळे जमले होते सायरा बानो आणि दिलीप कुमारांचे लग्न, वाचा दोघांची रोमँटिक लव्हस्टोरी

अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि सायरा बानो (Saira Banu) यांची प्रेमकथा सर्वांसाठीच खूप प्रेरणादायक आहे. दोघांनी हे सिद्ध केले की, जर प्रेम खरे असेल तर, आपल्याला कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरीही आपण कधीही आपले प्रेम गमावू शकत नाही.

Love Story | आईमुळे जमले होते सायरा बानो आणि दिलीप कुमारांचे लग्न, वाचा दोघांची रोमँटिक लव्हस्टोरी
दिलीप कुमार-सायरा बानो

मुंबई : अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि सायरा बानो (Saira Banu) यांची प्रेमकथा सर्वांसाठीच खूप प्रेरणादायक आहे. दोघांनी हे सिद्ध केले की, जर प्रेम खरे असेल तर, आपल्याला कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरीही आपण कधीही आपले प्रेम गमावू शकत नाही. दिलीप आणि सायरा बानो यांच्या वयात 22 वर्षांचे अंतर होते. परंतु, त्यांच्या प्रेमामुळे कधीही हे अंतर त्यांच्या नात्याच्या मधे येऊ शकले नाही. सायरा नेहमीच दिलीपकुमार यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांनी नेहमीच सिद्ध केले त्यांचे एकमेकांवरचे प्रेम खरे होते (Late Actor Dilip Kumar And Saira Banu Iconic love story of Bollywood).

दिलीपकुमार यांचा ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट 1960मध्ये मुंबईच्या प्रसिद्ध मराठा मंदिरात रिलीज झाला. तेव्हा अवघ्या 16 वर्षांच्या सायरा बानो आपल्या आवडत्या नायकाला पाहण्यासाठी तिथे गेल्या होत्या. पण तिथे गेल्यानंतर सायराजींचे हृदय तुटले. कारण दिलीप कुमार त्या प्रीमियरमध्ये आलेच नव्हते. सायराला याबद्दल खूप वाईट वाटले. तथापि, त्यानंतर त्यांनी स्वतः हिंदी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर एकदा सायराजींची दिलीप साहेबांशी भेट झाली. त्यावेळी सायराजी दिलीप कुमारांवरून आपली नजर हटवू शकल्या नाहीत.

पहिल्या भेटीत काय घडले?

त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना सायराजींनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा तो माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले की, तू सुंदर आहेस. त्यांचे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला. तेव्हाच मी ठरवलं होतं की, आता लग्न करेन तर दिलीप कुमारांशीच!’.

सायराजींच्या आईचा हट्ट

शम्मी कपूरबरोबर ‘जंगली’ या चित्रपटात काम केल्यानंतर सायराच्या राजेंद्र कुमारसोबत डेटिंगच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. यानंतर सायराजींच्या आई नसीम बानो दिलीप कुमार यांना भेटल्या आणि म्हणाल्या की, सायराशी याबद्दल बोला आणि तिला समजावून सांगा. त्यांच्या रिलेशनशिपच्या बातमीने सायराच्या आई खूश नव्हत्या आणि त्यांनी ही गोष्ट थांबवावी, अशी त्यांची इच्छा होती. सायराजींच्या आई या दोघांच्या नात्यामधील दुवा होत्या.

सायराजींच्या आईने दिलीप कुमार यांना सायराशी लग्न करण्यास सांगितले होते. परंतु, वयाचे अंतर लक्षात घेता दिलीप कुमार या लग्नासाठी तयार नव्हते. पण, सायराला नेहमीच दिलीप कुमारांशी लग्न करायचं होतं. दिलीपकुमार यांनी सायराला सांगितले की, तुला माझे पांढरे केस दिसत नाहीत का? पण सायराला काही फरक पडला नाही.

सायराजींना पाहून घायाळ झाले दिलीप कुमार

एकदा दिलीप कुमार सायरा बानो यांच्या घरी गेले होते. त्यावेळी साडी नेसलेल्या सायरा खूपच सुंदर दिसत होत्या. दिलीप कुमार त्यांना पाहून हरवून गेले आणि त्यांनी सायराजींना सांगितले की, त्या खूप क्यूट दिसत आहेत. यानंतर दुसर्‍या दिवशी दिलीपकुमार यांनी त्यांना पुन्हा फोन केला आणि सांगितले की, जेवण खूप चांगले झाले होते. यानंतर दिलीप कुमार सायराजींना सतत भेटू लागले. यानंतर दिलीप कुमारांनी सायरा बानो यांना प्रपोज केले. 1966मध्ये दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. लग्नाच्या वेळी सायराजींचे वय 22 आणि दिलीप कुमारांचे वय 44 होते.

सायराजींचा गर्भपात

लग्नानंतर दोघांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पण दिलीप आणि सायरा एकत्र प्रत्येक अडचणीला सामोरे गेले. दिलीप कुमार यांनी ‘सबस्टन्स अँड द शॅडो’ या आत्मचरित्रात सांगितले होते की, एकदा सायरा गरोदर होत्या, परंतु त्यांचा गर्भपात झाला होता. या घटनेनंतर दोघेही खूप हतबल झाले होते. परंतु, नंतर दोघेही एकमेकांचे आधार बनले. दोघांचे प्रेम नेहमीच अबाधित राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत सायरा दिलीपजींसोबत होत्या.

(Late Actor Dilip Kumar And Saira Banu Iconic love story of Bollywood)

हेही वाचा :

Video | ‘ते निघून गेले पण त्यांच्या आठवणी राहतील…’, दिलीप कुमारांच्या आठवणीने भावूक झाले धर्मेंद्र

Dance Deewane 3च्या मंचावर शगुफ्ता अलीने सांगितली ‘दर्दभरी दास्ताँ’, माधुरी दीक्षितने सरसावला मदतीचा हात!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI