Liger: विजय देवरकोंडा-अनन्या पांडेचा लोकलने प्रवास; ‘लायगर’चं हटके प्रमोशन

या चित्रपटाद्वारे विजय हा बॉलिवूडमध्ये आणि अनन्या ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. दोघंही या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतेच हे दोघे मुंबईतील वांद्रे परिसरात चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसले.

Liger: विजय देवरकोंडा-अनन्या पांडेचा लोकलने प्रवास; 'लायगर'चं हटके प्रमोशन
Liger: विजय देवरकोंडा-अनन्या पांडेचा लोकलने प्रवासImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 12:50 PM

अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘लायगर’ (Liger) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून विजय देवरकोंडाची अनन्यासोबतची केमिस्ट्रीही त्यांना खूप आवडली. या चित्रपटाद्वारे विजय हा बॉलिवूडमध्ये आणि अनन्या ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. दोघंही या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतेच हे दोघे मुंबईतील वांद्रे परिसरात चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसले. यावेळी ते मुलांसोबत डान्स करतानाही दिसले.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास केला. ट्रॅफिकवर मात करण्यासाठी त्यांनी लोकलने प्रवास केला असावा असंही म्हटलं जातंय. या प्रवासापूर्वी विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे हे प्लॅटफॉर्मवर बसून ट्रेनची वाट पाहत होते. अनन्या ही मूळची मुंबईची असली तरी यापूर्वी तिने लोकल ट्रेनने क्वचितच प्रवास केला असेल. पण विजयसाठी हा अनुभव नवीन होता. परंतु चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लोकल ट्रेनने प्रवास करणं ही एक चांगली कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

विजय आणि अनन्याचा लायगर हा चित्रपट येत्या 25 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय आणि अनन्याची जोडी नुकतीच करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये दिसली होती. यादरम्यान दोघांनीही करण जोहरच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खुलालेही केले. करण जोहरने दोघांनाही त्यांच्या प्रेम आणि सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर देताना दोघांनी काही खुलासे केले होते.

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.