Mahesh Bhatt Net Worth : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट, एकूण किती संपत्तीचे मालक?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 20, 2021 | 3:56 PM

महेश भट्ट (Mahesh Bhatt) हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय निर्माते आहेत. महेश एक निर्माता तसेच दिग्दर्शक देखील आहेत. ‘विशेष फिल्म्स’ नावाचे त्यांचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे, ज्याद्वारे त्यांनी अनेक चित्रपट निर्मित केले आहेत.

Mahesh Bhatt Net Worth : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट, एकूण किती संपत्तीचे मालक?
Mahesh Bhatt

मुंबई : निर्मात्यांशिवाय कोणताही चित्रपट बनवणे कठीण आहे. चित्रपटाचे खरे यश हे चित्रपट निर्मितीवर अवलंबून असते. महेश भट्ट (Mahesh Bhatt) हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय निर्माते आहेत. महेश एक निर्माता तसेच दिग्दर्शक देखील आहेत. ‘विशेष फिल्म्स’ नावाचे त्यांचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे, ज्याद्वारे त्यांनी अनेक चित्रपट निर्मित केले आहेत. ‘बिग बजेट’ चित्रपटासाठी पाण्यासारखा पैसा ओतणाऱ्या या निर्माता-दिग्दर्शकाची एकूण संपत्ती तुम्हाला माहीत आहे का?

महेश भट्ट बॉलिवूडचे अव्वल निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. ते त्यांच्या चित्रपटांद्वारे खूप चांगली कमाई करतात आणि म्हणूनच त्यांचे नेटवर्थ देखील खूप चांगले आहे. कॅकनॉलेजच्या अहवालानुसार, महेश भट्ट यांची एकूण संपत्ती 350 कोटी आहे. गेल्या काही वर्षांत महेश भट्ट यांची संपत्ती 55 टक्क्यांनी वाढली आहे. महेश भट्टंच्या निव्वळ संपत्तीमध्ये चित्रपट, वैयक्तिक गुंतवणूक आणि प्रॉडक्शन हाऊसची कमाई असते. वेबसाईट रिपोर्टनुसार, महेश भट्ट हे वर्षाकाठी 36 कोटींपेक्षा जास्त कमाई करतात. त्यांचे मासिक उत्पन्न 3 कोटींपेक्षा जास्त आहे.

घर

कॅकनॉलेजच्या अहवालानुसार, महेश भट्ट यांचे मुंबईत एक आलिशान घर आहे ज्याची किंमत 6.5 कोटी आहे. या व्यतिरिक्त, त्यांच्याकडे वेगवेगळ्या देशांमध्ये भरपूर मालमत्ता आहेत.

कार

महेश भट्ट यांच्याकडे अनेक लक्झरी वाहनांचा संग्रह आहे ज्यात बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर आणि मर्सिडीज बेंझ यांचा समावेश आहे. महेश भट्ट यांच्या प्रत्येक वाहनाची किंमत जवळपास 1.2 कोटी ते 2 कोटी दरम्यान आहे.

महेश भट्ट यांची कारकीर्द

वयाच्या 26व्या वर्षी महेश भट्ट यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी 1974 मध्ये ‘मंजिले और भी है’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. महेश यांचा चित्रपट ‘सारांश’ हा सर्वोत्कृष्ट परदेशी भाषिक चित्रपट म्हणून ऑस्करमध्येही गेला आहे. जरी चित्रपटाला पुरस्कार मिळाला नाही, पण चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद खूप चांगला होता.

महेश भट्ट यांनी ‘स्वाभिमान’ आणि ‘कभी कभी’ सारख्या टीव्ही मालिका दिग्दर्शित केल्या आहेत आणि ‘माउथफुल ऑफ स्काय’ या पहिली इंग्रजी टीव्ही मालिका देखील दिग्दर्शित केली आहे.

महेश भट्ट यांनी इम्रान हाश्मीच्या ‘मिस्टर एक्स’ या चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून देखील पदार्पण केले. त्यांनी चित्रपटाचे शीर्षक गीत गायले होते.

लोकप्रिय चित्रपट

महेश भट्ट यांनी ‘सारांश’, ‘सियासत’, ‘आशिकी’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘सडक’, ‘जुनून’, ‘गुण’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘गुमराह’ या चित्रपटांसाठी काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून महेश यांनी 1990मध्ये ‘कारतूस’ हा चित्रपट बनवला. यानंतर, 2020 मध्ये त्यांनी ‘सडक 2’ हा चित्रपट हाती घेतला. अनेक वर्षांनंतर महेश यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केले. या चित्रपटात आलिया भट्ट, पूजा भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होते. मात्र, हा चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकला नाही.

हेही वाचा :

Rashmi Rocket | चेहऱ्यावर धूळ तर डोळ्यात विजयाची स्वप्न, तापसी पन्नूच्या आगामी ‘रश्मि रॉकेट’चं नवं पोस्टर पाहिलंत का?

Thalapathy Vijay | थलापती विजयने आई-वडिलांविरोधात दाखल केली तक्रार, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI