अर्जुन कपूरच्या टी-शर्टवर खास संदेश, मलायकाने शेअर केला फोटो !

14 फेब्रुवारी हा असा दिवस आहे, ज्या दिवशी प्रेमी जोडपे एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपल्या प्रेमभावना व्यक्त करतात.

अर्जुन कपूरच्या टी-शर्टवर खास संदेश, मलायकाने शेअर केला फोटो !
नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मलायका आणि अर्जुन गोव्याला गेले होते तेथील काही फोटो सोशम मीडियावर शेअर करण्यात आले होते.

मुंबई : 14 फेब्रुवारी हा असा दिवस आहे, ज्या दिवशी प्रेमी जोडपे एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपल्या प्रेमभावना व्यक्त करतात. या दिवशी बरेच लोक एकमेकांना प्रपोज देखील करतात. अशा परिस्थितीत बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा रोमँटिक मूडमध्ये आहेत. नुकताच मलायका अरोराने (Malaika Arora) तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) फोटो शेअर केला आहे. (Malaika Arora shared a photo of Arjun Kapoor on the occasion of Valentine’s Day)

Malaika Arora

यामध्ये अर्जुनने घातलेल्या टी-शर्टवर लिहिले आहे की, लव इज इन द एयर असे म्हणत मलायकाने अर्जुनला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नववर्षाचं सेलिब्रेशन करायला मलायका आणि अर्जुनची जोडी गोव्यात पोहोचली होती. काही मित्र-मैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत मलायका आणि अर्जुन सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले होते.

मलायकाने गोव्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले होते. त्यामध्ये मलायकाने बोल्ट लूकमधील दिसत होती. तिचे ते फोटो चाहत्यांना खूप आवडली होती. तिच्या या फोटोमध्ये अर्जुन देखील दिसत होता. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये रंगत होत्या.

मात्र, मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या चर्चेला ब्रेक मिळाला आहे. सध्या तरी दोघे लग्न करणार नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सांगण्यात आली होती. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत.

संबंधित बातम्या : 

‘सावधान इंडिया’च्या आर्ट डायरेक्टरसह दोघे अपघातात ठार; 20 तासांची शिफ्ट संपवून घरी जाताना दुर्घटना

दोस्तांसाठी कायपण! वरुण धवनच्या पार्टीला मलायकापासून कियाराची हजेरी!

रणबीर कपूरची ‘रेंज रोवर’ मुंबई पोलिसांकडून ताब्यात, काय आहे प्रकरण?

(Malaika Arora shared a photo of Arjun Kapoor on the occasion of Valentine’s Day)

Published On - 11:06 am, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI