AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकर पत्नी, मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर का शेअर करत नव्हते? मल्हारने सांगितलं ते सीक्रेट

मल्हार पाटेकर यांनी नाना पाटेकर कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर का शेअर करत नव्हते, याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. नानांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या अफवांना मल्हारने उत्तर दिले आहे. शारीरिक दुराव्यानंतरही कुटुंबाचे भावनिक नाते कसे एकसंध होते, हे त्यांनी सांगितले. नानांचे सक्रिय जीवन, समाजकार्य आणि अभिनयातील वेगळेपण यावरही प्रकाश टाकला.

नाना पाटेकर पत्नी, मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर का शेअर करत नव्हते? मल्हारने सांगितलं ते सीक्रेट
nana patekar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 5:04 PM
Share

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यांच्या स्वभावाबद्दल बोललं जात आहे. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दलही भरभरून बोललं जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही लिहिलं जात आहे. नाना पाटेकर पत्नीपासून 35 वर्ष दूर होते. त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. दोघांचं जमत नव्हतं, असं बोललं जात आहे. ज्यांची कधीच नाना पाटेकर यांच्याशी भेट झाली नाही, असे लोकही नानांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही लिहित आहेत. या सर्वांना नानांचे चिरंजीव मल्हार पाटेकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. नाना पाटेकर कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर का शेअर करत नव्हते, याची माहिती मल्हार यांनी दिली आहे.

हिंदुस्थान टाइम्सला मल्हार पाटेकर यांनी मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी पाटेकर कुटुंबावर भाष्य केलं आहे. आम्ही भावनिक दृष्ट्या एकमेकांशी अत्यंत एकरूप आहोत. माझे आईवडील, मी, माझे चुलते आणि माझे चुलत भाऊ आम्ही सर्व एकसंघ आहोत. आमच्यात भावनिक एकोपा आहे. आज आमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी व्हायरल होत आहेत. त्यातील असंख्य गोष्टी चुकीच्या आहेत. सोशल मीडियावर काहीही व्हायरल होतं म्हणूनच आम्ही इन्स्टाग्रामवर कुटुंबाचे फोटो कधीच व्हायरल करत नव्हतो. याचा अर्थ असा नाही की आमच्यात प्रेम किंवा जिव्हाळा नाही. वेगळं झाल्यानंतरही माझ्या आईवडिलांचे चांगले संबंध होते. 38-39 वर्षापासूनचं त्यांचं नातं होतं. बाहेर जे दिसतं, तसं कधी नातं नसतं, असं मल्हार यांनी सांगितलं.

नाना कधीच एकटे नव्हते

मी जे काही वाचलं त्याचं उत्तर एकच की नाना एकटे नव्हते. कधीच एकटे नव्हते. आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो म्हणून त्यांची तब्येत खराब होती असं नाही. आमच्यापैकी कोणी ना कोणी तरी त्यांच्यासोबत असायचा. ते खूप सक्रिय होते. जीममध्ये अडीच तास घालवायचे. व्यायाम करायचे. आजकालचे तरुणही एवढं करत नाहीत. त्यांच्या फिटनेसचा स्तर असा होता, असं मल्हार म्हणाले.

काम एकसारखं नको

मला आठवतंय. त्यांनी एकदा मला एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते, काम एकसारखं असू नये. त्यात वेगळंपण असलं पाहिजे. त्यामुळेच त्यांनी खामोशी सिनेमात काम केलं. पल्लेदार संवादाशिवायही आपण सर्वश्रेष्ठ अभिनय करू शकतो हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. दमदार संवाद म्हणजे नाना पाटेकर हे समीकरण होतं. त्यापेक्षा त्यांना वेगळं काही करायचं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

समाजसेवेत आनंद

सध्या ते समाजकार्यात रमले होते. त्यात त्यांना आनंद मिळत होता. काश्मीरमध्ये शाळा बनवण्यासाठी प्रयत्न करणं आणि शेतकऱ्यांसाठी शाश्वत असं काम करणं यावर त्यांनी भर दिला होता. आता ही जबाबदारी माझीही आहे. मी ही जबाबदारी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?