Video | आधी ठसन दिली, मग विजय थलापतीनं विजय सेतूपतीला मिठी मारली! असं का केलं?

Master : चित्रपट 13 जानेवारी 2021 ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अवघ्या 3 दिवसात चित्रपटाने तब्बल 100 कोटींचा गल्ला केला होता

Video | आधी ठसन दिली, मग विजय थलापतीनं विजय सेतूपतीला मिठी मारली! असं का केलं?
मास्टर सिनेमाची आठवण सेतूपतीनं केली शेअर

मास्टर (Master Movie) सिनेमाला एक वर्ष पूर्ण झालं. गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त विजय सेतूपतीनं (Vijay Sethupathi) आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन खास व्हिडीओ शेअर केला आहे. मास्टर सिनेमात विजय थलापती (Vijay Thalapathy) आणि विजय सेतूपती यांची पॉवरपॅक्ट ऍक्शन आणि ड्रामा प्रेक्षकांनी अनुभवला होता. एका सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केल्यानंतर या दोन्ही लेडेंजरी साऊथ सुपरस्टार्सची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. गेलं वर्षभर मास्टर सिनेमातलं वाथी कमिंग हे गाणं तुफान गाजत होतं. मास्टरच्या भूमिकेत असलेल्या विजय थलापतीनं हिरोची भूमिका वढवली होती. तर याच सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत विजय सेतूपतीनंही आपल्या अभिनयानं सगळ्यांना चकीत केलं होतं. दरम्यान, आता मास्टर सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विजय सेतूपतीनं आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन खास व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये विजय सेतूपती आणि विजय थलापती यांच्यात आधी राग आणि नंतर प्रेम दिसून आलंय. आधी एकमेकांना ठसन दिल्यानंतर दोन्हीही सुपरस्टार्स विजय यांनी एकमेकांना मिठी मारली आहे.

काय झालं होतं..?

विजय सेतूपतीसोबत मास्टर सिनेमात मास्टरच्याच भूमिकेत असलेल्या विजय थलापतीनं तगडा फायटिंग सीन केला आहे. या फायटिंग सीनच्या रेकॉर्डिंगच्या वेळची आठवण विजय सेतूपतीनं शेअर केली आहे. क्लायमॅक्सची आठवण करुन देणाऱ्या या सीनमध्ये विजय सेतूपती आणि विजय थलापती यांच्या जोरदार राडा बघायला मिळाला आहे. ऍक्शनपॅक्ट सीनच्या आठवणी विजय सेतूपतीनं शेअर केल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये रेकॉर्डिंगच्या वेळच्या आठवणी बघायला मिळाल्या असून आधी या दोन्ही स्टार्सनी एकमेकांना जोरदार ठसन दिली. त्यानंतर दोघेही विजय एकमेकांची गळाभेट घेतना दिसले. दोघांनीही एकमेकांच्या अभिनयाबद्दल आदर व्यक्त करतानाच सोबत काम करण्याचा आनंदही यावेळी घेतला. तसंच या दोन्ही अभिनेत्यांना एकत्र पाहून दोन्ही विजयचे स्टारही भारावून गेले होते.

आतापर्यंत 1,386,242 इतक्या जणांनी विजय सेतूपतीनं शेअर केलेला हा व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाहा खास व्हिडीओ –

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापती आणि विजय सेतुपतीचा ‘मास्टर’ (Master) हा चित्रपट गेल्या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट 13 जानेवारी 2021 ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अवघ्या 3 दिवसात चित्रपटाने तब्बल 100 कोटींचा गल्ला केला होता. चित्रपटगृहानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आल. ‘मास्टर’ आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर या सिनेमानं ओटीटीवरही आपली छाप सोडली होती.

संबंधित बातम्या :

बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत थलपती विजयचा ‘मास्टर’ ठरला सर्वात फेव्हरेट चित्रपट

Lookalike: चालणं, बोलणंच काय, दिसायलाही डिट्टो; थलापति विजय ड्युप्लिकेट पाहिला का?

Thalapathy Vijay | थलापती विजयने आई-वडिलांविरोधात दाखल केली तक्रार, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?


Published On - 3:03 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI