Munna Bhai MBBS: मुन्ना भाईकडून ‘जादू की झप्पी’ घेणारे सुरेंद्र राजन यांचा बॉलिवूडला रामराम!

Munna Bhai MBBS: मुन्ना भाईकडून 'जादू की झप्पी' घेणारे सुरेंद्र राजन यांचा बॉलिवूडला रामराम!
Surendra Rajan
Image Credit source: Twitter

कोरोना महामारी आणि लॉकडाउनच्या काळात 2020 मध्ये राजन (Surendra Rajan) यांना आर्थिक संकटांनाही सामोरं जावं लागलं होतं. मार्च 2020 मध्ये ते एका वेब सीरिजच्या शूटिंगसाठी मुंबईला आले होते. मात्र लॉकडाउनमुळे ते इथेच अडकून पडले होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 15, 2022 | 11:37 AM

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (Munna Bhai MBBS) या चित्रपटात रुग्णालयात साफसफाई कर्मचारी मकसूद भाईची भूमिका साकारणारे अभिनेते सुरेंद्र राजन (Surendra Rajan) आठवतायत का? चित्रपटात मुन्नाभाईने त्यांना ‘जादू की झप्पी’ दिली होती आणि हा सीन प्रेक्षकांना खूपच आवडला होता. 84 वर्षीय सुरेंद्र राजन हे आता अभिनयविश्वाला, बॉलिवूडला रामराम करत आहेत. ‘हू ॲम आय’ (Who Am I) या त्यांच्या शेवटच्या चित्रपटानंतर ते अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार आहेत. सुरेंद्र यांनी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या या शेवटच्या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर लंडनमध्ये पार पडणाऱ्या 24व्या युके एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडणार आहे. राजन यांनी आतापर्यंत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘द लेजंड ऑफ भगत सिंग’, ‘आर. राजकुमार’, ‘फंस गये रे ओबामा’, ‘धमाल’, ‘बच्चन पांडे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.

शेवटच्या चित्रपटाच्या आधीसुद्धा राजन यांनी काही काळासाठी ब्रेक घेतला होता. ते उत्तराखंडमध्ये राहायला गेले होते. मात्र बॉलिवूडला रामराम करण्याआधी त्यांनी आणखी एका चित्रपटात काम करायचं ठरवलं आणि ‘हू ॲम आय’ या चित्रपटाची ऑफर स्वीकारली. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्यांनी कोविडच्या काळात मध्यप्रदेशपर्यंत प्रवास केला होता.

शिरीष खेमरियाँ दिग्दर्शित या चित्रपटात ‘पंचायत’ फेम अभिनेता शशी वर्मा, पगलाइट फेम चेतन शर्मा आणि नवोदित अभिनेत्री रिषिका चंदानी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. कोरोना महामारी आणि लॉकडाउनच्या काळात 2020 मध्ये राजन यांना आर्थिक संकटांनाही सामोरं जावं लागलं होतं. मार्च 2020 मध्ये ते एका वेब सीरिजच्या शूटिंगसाठी मुंबईला आले होते. मात्र लॉकडाउनमुळे ते इथेच अडकून पडले होते. अनेक चित्रपटांमध्ये महात्मा गांधी यांची भूमिका साकारणारे सुरेंद्र राजन यांच्याकडे दुर्दैवाने त्यावेळी मुंबईत घराचं भाडं भरायलासुद्धा पैसे नव्हते. त्यावेळी अभिनेता सोनू सूदने त्यांची मदत केली होती.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें