Break Up story | 20 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या नानांच्या प्रेमात पडली होती मनीषा कोईराला, ‘या’ कारणामुळे झाला होता ब्रेकअप

एक काळ असा होता की, नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला एकमेकांवरव भरपूर प्रेम करायचे. परंतु त्यांच्यात अशा काही गोष्टी घडल्या होत्या की, त्यांचे प्रेम कायमचे संपून गेले. चला तर जाणून घेऊया असं नेमकं काय झालं...

Break Up story | 20 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या नानांच्या प्रेमात पडली होती मनीषा कोईराला, ‘या’ कारणामुळे झाला होता ब्रेकअप
नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 12:12 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज असतात ज्या नेहमीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चेत असतात. बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांच्या प्रेमकथेचा अतिशय वेदनादायी अंत झाला होता. यातीलच एक म्हणजे नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मनीषा कोईराला (Manisha Koirala) यांची प्रेमकथा. आजही मनीषा आणि नानाच्या ब्रेकअप कथेची चर्चा सुरू असते (Nana Patekar and Manisha Koirala break up story).

एक काळ असा होता की, नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला एकमेकांवरव भरपूर प्रेम करायचे. परंतु त्यांच्यात अशा काही गोष्टी घडल्या होत्या की, त्यांचे प्रेम कायमचे संपून गेले. चला तर जाणून घेऊया असं नेमकं काय झालं…

अशी झाली प्रेम कहाणी सुरू

असे म्हणतात की नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी ‘अग्निसाक्षी’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटा दरम्यान दोघेही एकमेकांचे चांगले मित्र बनले होते आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले होते. यावेळी मनीषा नानापेक्षा तब्बल 20 वर्षांनी लहान होती.

प्रेमात आकंठ बुडाले

नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला जेव्हा ‘खामोशी द म्युझिकल’ मध्ये एकत्र काम करत होते, तेव्हा दोघांनाही त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम जाणवले. असं म्हणतात की, या चित्रपटात नाना मनीषाच्या वडिलांची भूमिका करत होते. पण या दोघांनाही त्यांचे नाते कळले होते. जेव्हा दोघांचे प्रेम सुरू झाले तेव्हा नानाचे आधीच लग्न झाले होते. असे म्हणतात की नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलाकांती यांच्यात सर्व काही ठीक नव्हते. असेही म्हटले जाते की त्यावेळी नीलाकांती त्यांच्यापासून वेगळी राहत असायची (Nana Patekar and Manisha Koirala break up story).

नाना मनीषाबद्दल पजेसिव्ह होते

असे म्हटले जाते की नानांचे मनीषावर इतके प्रेम होते की, ते खूप पझेसिव्ह झाले होता. असे म्हणतात की चित्रपटाच्या शूटिंगसाठी मनीषाने छोटे कपडे परिधान केले असतील तर नाना पाटेकर यांना ते आवडायचे नाही, असे कपडे घालण्यास ते नकार देत असत.

मनीषाला तिच्या नात्याला नाव हवे होते!

नानाच्या प्रेमात पूर्णपणे बुडलेल्या मनीषाला कोणत्याही किंमतीने तिच्या नात्याला योग्य नाव द्यायचे होते. वास्तविक तिला नाना पाटेकर यांच्याशी लग्न करायचे होते. पण नानाला आपली पत्नी निलकांतीशी घटस्फोट घ्यायचा नव्हता. नानाची उदासीनता आणि लग्न न करण्याच्या गोष्टीने मनीषाला त्यांच्यापासून दूर नेण्यास सुरुवात केली होती.

दुसऱ्या अभिनेत्रीसह पकडले गेले नाना

बातमीनुसार, जेव्हा मनीषाने नानाला दुसर्‍या अभिनेत्रीसोबत पकडले तेव्हा दोघांचे नाते पूर्णपणे तुटले होते. माध्यमांच्या अहवालानुसार, एकदा मनीषा कोईराला नानाच्या खोलीत आयशा जुल्का एकत्र दिसली होती. नानाला आयशासोबत पाहून तिला खूप वाईट वाटले. यानंतर तिने लग्नासाठी आग्रह धरला, परंतु मनीषाने गोंधळ घालून या नात्याचा पूर्णपणे नाश केला होता. नानाच्या या प्रतारणेने मनीषाचे हृदय तुटले आणि तिने नानापासून कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे नाते तुटल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

(Nana Patekar and Manisha Koirala break up story)

हेही वाचा :

Happy Birthday Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘या’ चित्रपटांनी दिली बड्या कलाकारांना टक्कर, जाणून घ्या या खास चित्रपटांबद्दल

Video | बिकिनी अवतारात मंदिरा बेदीचा योगा, चाहत्यांना दिल्या ऑक्सिजन वाढवण्याच्या टिप्स!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.