AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : कसं आहे नाना पाटेकर यांचं डोणजे गाव? लोकसंख्या किती?

नाना पाटेकर यांचं डोणजे गाव, जिथे त्यांनी खडकावासलाजवळ फार्महाऊसमध्ये निसर्गाशी संवाद साधत शांत जीवन व्यतीत केलं. सिनेसृष्टीतील नटसम्राट असले तरी, ते स्वतः शेती करायचे, स्वयंपाक करायचे. त्यांच्या फार्महाऊसला 'नानावाडी' म्हणून ओळखलं जातं.

Nana Patekar : कसं आहे नाना पाटेकर यांचं डोणजे गाव? लोकसंख्या किती?
nana patekar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 11:53 PM
Share

सिनेसृष्टीतील नटसम्राट नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने काल निधन झालं. गोव्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर काल रात्री उशिरा पुण्यातील डोणजे या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी नाना पाटेकर यांच्या शेकडो चाहत्यांनी त्यांना साश्रूनयनांनी निरोप दिला. नाना पाटेकर अचानक गेल्याने प्रत्येकाला धक्का बसला आहे. समाजासाठी नेहमी तत्पर असणारा, गरजवंतांचा आधारवड असणाऱ्या अभिनेत्याला देश मुकला. त्यामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाना पाटेकर हे मूळचे मुरूड जंजिऱ्याचे. पण त्यांचं बालपण चुनाभट्टीत गेलं. त्यानंतर आयुष्याचा बराच काळ त्यांनी माहीममध्ये घालवलं. माटुंग्यातही ते काही काळ होते. नंतर अंधेरीला राह्यला गेले. नाना पाटेकर यांना गावाची कायम ओढ होती. त्यामुळे त्यांनी पुण्यातील हवेली तालुक्यातील डोणजे येथे घर घेतलं होतं. खडकवासला धरणाच्या जवळच नानाचा 27 एकराचा फार्म हाऊस होता. हा फार्महाऊस नानावाडी म्हणून ओळखला जातो.

nana patekar

nana patekar

निसर्गाशी संवाद

या फार्म हाऊसमध्ये नाना पाटेकर यांनी विविध प्रकारची झाडं लावली होती. ते स्वत: शेतात काम करायचे. तिथे एकटेच राहायचे. स्वत:चं जेवण स्वत: बनवायचे. कुणावरही ते अवलंबून नसायचे. या फार्म हाऊसमध्येच त्यांनी जीम तयार केली होती. घरात मोठं पुस्तक संग्रहालय होतं. त्यामुळे शेतात काम, जीम आणि पुस्तकं यात त्यांचा दिवस निघून जायचा. कधी किशोरी अमोणकरांना ऐकायचं तर कधी राहुल देशपांडेंना. शेतातील भल्या मोठ्या विहिरीजवळ येऊन तास न् तास बसणं. डोंगराकडे निरखून पाहणं. निसर्गाशी संवाद साधणं ही त्यांची दिनचर्या झाली होती. शहरापेक्षा गावात राहायला त्यांना प्रचंड आवडायचं.

कसं आहे डोणजे गाव?

डोणजे गावाची लोकसंख्या 3565 एवढी आहे. गावात 1822 पुरुष आहेत. तर 1743 महिला आहेत. गावात 713 कुटुंबे आहेत. गावाचं क्षेत्रफळ 954 हेक्टर एवढं आहे. डोंगराच्या कुशीत बसलेलं हे गाव आहे. बाजूलाच खडकवासला धरण असल्याने गावात पाण्याची कमतरता नाही. कसलीच ददात नाही. गावात भांडण नाही, तंटा नाही. गावकरी सर्व नानांना मानायचे. नानांचा आदर करायचे. रोज कोणी ना कोणी गावकरी त्यांना भेटायला यायचा.

nana patekar

nana patekar

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...