Death Anniversary | संजयला ड्रग्जची सवय नर्गिसनी सुनील दत्तपासून लपवली गोष्ट, मृत्यूनंतर समोर आलं कारण…

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आज पुण्यतिथी आहे (Nargis Dutt Death Anniversary). अभिनेत्री नर्गिस या सुनील दत्त (Sunil Dutt) यांच्या पत्नी होत्या. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) हा त्यांचा मुलगा आहे.

Death Anniversary | संजयला ड्रग्जची सवय नर्गिसनी सुनील दत्तपासून लपवली गोष्ट, मृत्यूनंतर समोर आलं कारण...
दत्त कुटुंब
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 10:32 AM

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आज पुण्यतिथी आहे (Nargis Dutt Death Anniversary). देशभरातून त्यांची आजच्या या विशेष दिवशी त्यांची आठवण काढली जात आहे. अभिनेत्री नर्गिस या सुनील दत्त (Sunil Dutt) यांच्या पत्नी होत्या. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) हा त्यांचा मुलगा आहे. संजय दत्तच्या अंमली पदार्थांच्या व्यसनाबद्दल नर्गिसला आधीच माहिती होती असं म्हणतात. असं म्हणतात की, जेव्हा संजय दत्त बोर्डिंग स्कूलमध्ये गेला होता तेव्हाच त्यांना संजयच्या या सवयीबद्दल कळलं होतं (Nargis Dutt Death Anniversary nargis hide sanjay drugs addiction from sunil dutt).

पण नर्गिस यांनी आईच्या ममतेने कुणासमोरही या गोष्टीचा उल्लेख कधी केला नाही. त्यांना वाटले की संजय दत्त स्वत:या गोष्टींमधून बाहेर पडेल. संजय नर्गिस यांच्या खूप जवळ होता. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक छोटीशी गोष्ट तो त्याच्या आईबरोबर शेअर करत असे.

तोपर्यंत वेळ निघून गेली होती…

नर्गिसच्या मृत्यूनंतर संजय दत्तला ड्रग्ज घेतल्याबद्दल सुनील दत्तला कळलं, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. सुनील दत्तने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ते त्या दिवसांत इतके व्यस्त असायचे की त्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हते. ते म्हणाले की, “मला संजयच्या या सवयीबद्दल कधीच कळले नाही. पण तो ड्रग्जच्या खूप व्यसनाधीन झाला होता.” रेन्जेव्ह्यू विथ सिमी गरेवाल या टीव्ही कार्यक्रमात सुनील दत्त यांनी ही गोष्ट उघड केली होती (Nargis Dutt Death Anniversary nargis hide sanjay drugs addiction from sunil dutt).

मुलाच्या प्रेमापोटी लपवल्या मोठ्या गोष्टी

नर्गिस आणि सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, नर्गिसने संजय ड्रग्ज घेतल्या असल्याबद्दल संशय व्यक्त केला होता, पण मुलाबद्दलच्या प्रेमापोटी त्यांनी सुनील यांना या गोष्टी सांगितल्या नाहीत. सुनील यांनी देखील सांगितले होते की, नर्गिसच्या मृत्यूनंतर संजयला मोठा धक्का बसला होता. संजयला खूप एकटे वाटले आणि याचवेळी त्यांना कळले की संजय दत्तला ड्रग्सची सवय आहे. त्यानंतर सुनील दत्त यांनी त्याला या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी अमेरिकेतील एका पुनर्वसन केंद्रात पाठवले. याच ठिकाणी जाऊन उपचार घेतल्यानंतर संजय पूर्णपणे बारा झाला आणि पुन्हा भारतात परत आला. परंतु, अजूनही त्याची मद्यपानाची सवय सुटलेली नाही. अनेकदा बऱ्याच पार्टीमध्ये तो मद्यधुंद अवस्थेत स्पॉट होत असतो.

(Nargis Dutt Death Anniversary nargis hide sanjay drugs addiction from sunil dutt)

हेही वाचा :

Hina Khan : वडिलांच्या निधनानंतर आईला भेटणंही मुश्कील, अभिनेत्री हीना खानची हतबलता

Dilip Kumar | 98 वर्षीय अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात, प्रकृती स्थिर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.