Dilip Kumar | 98 वर्षीय अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात, प्रकृती स्थिर

"दिलीप साब यांची प्रकृती आधीपेक्षा चांगली आहे. त्यांना रविवारी डिस्चार्ज मिळेल" असं सायरा बानो यांनी ई-टाइम्सला सांगितलं (Dilip Kumar Health Update)

Dilip Kumar | 98 वर्षीय अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात, प्रकृती स्थिर
Dilip Kumar
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 9:43 AM

मुंबई : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी-अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. 98 वर्षीय दिलीप कुमार यांना रेग्युलर हेल्थ चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या तब्येतीत सुधारणा असून रविवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता सायरा बानो यांनी वर्तवली. (Veteran Actor Dilip Kumar Admitted to Hospital wife Saira Banu gives Health Update)

“दिलीप साब यांची प्रकृती आधीपेक्षा चांगली आहे. त्यांना रविवारी डिस्चार्ज मिळेल” असं सायरा बानो यांनी ई-टाइम्सला सांगितलं. कोरोनाचा काळ असल्यामुळे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिलीप कुमार यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला होता. सायरा बानो यांनी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या वाढदिवशी गरजूंना दान केले होते.

ट्विटरवरुन प्रार्थना

दिलीप कुमार यांनी 28 एप्रिलला ट्वीट केले होते. “सर्वांनी काळजी घ्या, मी सर्वांसाठी प्रार्थना करत आहे, आपण लवकरच कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळवू” अशा आशयाचं ट्वीट दिलीप कुमार गेल्या काही काळात करत आहेत.

पतीची सेवा करणाऱ्या सायरा बानो

“दिलीप कुमार माझ्या हृदयाची धडकन आहेत. त्यांना स्पर्श करणं, त्यांच्याकडे पाहत राहणं हा माझ्यासाठी जगातील सर्वोच्च आनंद आहे. तेच माझा श्वासोच्छ्वास आहेत, मी आजन्म त्यांच्याकडे पाहत राहू शकते. मी आजही त्यांची दृष्ट काढते” असं सायरा बानो यांनी मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं. (Veteran Actor Dilip Kumar Admitted to Hospital wife Saira Banu gives Health Update)

“दिलीप साब सध्या खूपच कमजोर झाले आहेत. त्यांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे. ते अनेकदा हॉलपर्यंत येऊन परत जातात. त्यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करा” असं आवाहन त्यांनी केलं होतं.

बारा दिवसात दोन भाऊ गमावले

दिलीप कुमार यांच्या दोघा धाकट्या भावांचा गेल्या वर्षी कोरोनाने मृत्यू झाला. 88 वर्षीय अस्लम खान यांचे 21 ऑगस्ट रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. तर बारा दिवसांनीच (चार सप्टेंबर) 92 वर्षांच्या एहसान खान यांची प्राणज्योत मालवली. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी दिलीप कुमार यांना घरीच आयसोलेट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

बारा दिवसात दोन भाऊ गमावले, दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू एहसान खान यांचे निधन

दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा

(Veteran Actor Dilip Kumar Admitted to Hospital wife Saira Banu gives Health Update)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.