Radhe Shyam : प्रभास आणि पूजा हेगडेच्या ‘राधेश्याम’ची उत्सुकता; जन्माष्टमीच्या निमित्ताने नव्या पोस्टरचे अनावरण!

उत्सुकतेत आणखी भर टाकत, बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या टीमनं जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आज नव्या नेत्रदीपक अशा पोस्टरचं अनावरण केलं आहे. (New poster of 'Radheshyam' unveiled on the occasion of Janmashtami, starring Prabhas and Pooja Hegde!)

Radhe Shyam : प्रभास आणि पूजा हेगडेच्या 'राधेश्याम'ची उत्सुकता; जन्माष्टमीच्या निमित्ताने नव्या पोस्टरचे अनावरण!

मुंबई : सुपरस्टार प्रभासचा (Superstar Prabhas) प्रत्येक चाहता ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता आला आहे. पॅन इंडिया स्टारचा बिग कॅनव्हास, रोमँटिक ड्रामा ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) पुढील वर्षी मकर संक्रांतीला संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर नव्या नेत्रदीपक पोस्टरचं अनावरण

या बातमीनं चाहत्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. या उत्सुकतेत आणखी भर टाकत, बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या टीमनं जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आज नव्या नेत्रदीपक अशा पोस्टरचं अनावरण केलं आहे. यामध्ये प्रभास एका सुंदर टक्सिडोमध्ये आणि पूजा हेगडेनं एक सुंदर बॉल गाऊन परिधान केलेला दिसतो आहे, पोस्टर थेट एका परीकथेतून अवतरल्यासारखं भासत आहे. सोबतच चित्रपटात चाहत्यांसाठी साठवून ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची झलक या पास्टरमध्ये दिसत आहे.

राधे श्याम एका मेगा कॅनव्हासवर अवतरणार

प्रसिद्ध दिग्दर्शिक राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटातील ही एक बहुभाषिक प्रेमकथा 1970 मध्ये युरोपमध्ये घडते. इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीत झालेला हा चित्रपट आहे. सोबतच अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सनं सज्ज राधे श्याम एका मेगा कॅनव्हासवर अवतरणार आहे, यामध्ये प्रभास आणि पूजा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनोख्या रूपात दिसणार आहेत.

दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी व्यक्त केल्या भावना

दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार म्हणाले की, ‘या चित्रपटावर आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि आम्ही प्रेक्षकांना एक भव्य नाट्यानुभव देण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. राधे श्याम 14 जानेवारी 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून जन्माष्टमीच्या या विशेष दिवशी चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.’

राधेश्याम हा बहुभाषिक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सीरिज यांची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केलं आहे. यूव्ही क्रिएशन्सनं तयार केलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.

प्रभासने 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ईश्वर’ या तेलुगु चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. यानंतर तो ‘राघवेंद्र’, ‘योगी’, ‘डार्लिंग’, ‘निरंजन’, ‘रेबेल’ आणि ‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांत झळकला होता. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘अॅक्शन जॅक्शन या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तो लहानशा भूमिकेत झळकला होता. प्रभासचा वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘राधेश्याम’ चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. प्रभासच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले होते. त्या पोस्टरमध्ये प्रभासचा डॅशिंग आणि स्टाइलिश लूक दिसला होता.

संबंधित बातम्या

सर्वात उंचीवर असलेल्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला ‘बेलबॉटम’, आनंद व्यक्त करताना अक्षय कुमार म्हणाला…

Birthday Special : अल्ताफ राजाच्या गाण्यातून मिळाली खास ओळख, चित्रांगदा सिंग सध्या काय करतेय?

Nusrat Bharucha : अभिनेत्री नुसरत भरुचाचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI