निहार पांड्या-नीति मोहनच्या लेकाची पहिली झलक सोशल मीडियावर चर्चेत! पाहा ‘नाव’ काय ठेवलं?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिचा एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्या (Nihaar Pandya) ‘बाबा’ झाला आहे. त्याची पत्नी-गायिका नीति मोहन (Neeti Mohan) हिने एका मुलाला जन्म दिला आहे. दोघेही पालकत्वाचा आनंद घेत आहेत.

निहार पांड्या-नीति मोहनच्या लेकाची पहिली झलक सोशल मीडियावर चर्चेत! पाहा ‘नाव’ काय ठेवलं?
निहार-नीति
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jun 18, 2021 | 11:29 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिचा एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्या (Nihaar Pandya) ‘बाबा’ झाला आहे. त्याची पत्नी-गायिका नीति मोहन (Neeti Mohan) हिने एका मुलाला जन्म दिला आहे. दोघेही पालकत्वाचा आनंद घेत आहेत. आता नीति आणि निहारने चाहत्यांना आपल्या मुलाची झलक दाखवली आहे आणि त्याचवेळी त्यांनी मुलाचे नावही जाहीर केले आहे (Nihar Pandya and Neeti Mohan share first photo of son Aryaveer on social media).

नीतिने निहार आणि लेकासह एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नीतिने आपल्या अकाऊंटवर 4 फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत हे तिघेही एकमेकांचे हात पकडताना दिसत आहेत आणि मग निहार आणि नीतिच्या मांडीवर त्यांचा मुलगा दिसत आहे. यावेळी नीति आणि निहारने व्हाईट कलरचे आऊटफिट परिधान केले आहे. तिघेही एकत्र खूप क्युट दिसत आहेत.

पाहा पोस्ट

View this post on Instagram

A post shared by NEETI MOHAN (@neetimohan18)

फोटो शेअर करताना नीतिने लिहिले की, ‘त्याचा लहान हात धरणे हा आतापर्यंत जाणवलेला सर्वात अनमोल स्पर्श आहे. आर्यवीरने आम्हाला त्याचे पालक म्हणून निवडले. यापेक्षा चांगले काहीच नाही. आर्यवीरने आमचा आनंद आणखी वाढवला आहे. खूप आनंदी आणि कायम कृतज्ञ आहोत…’

आम्ही स्वप्न जगत आहोत!

काही दिवसांपूर्वी वडील होण्याचा अनुभव सांगताना निहार म्हणाला होता की, ‘बाळाचे आगमन होण्यापूर्वी आम्ही त्याबद्दल फक्त पुस्तकांमधून माहिती घेत होतो. पण, बाळाच्या आगमनानंतर जादू आमच्या जीवनात आली आहे. मी आणि नीति आमचे स्वप्न जगत आहोत. आमच्या बाळाने आमचे आयुष्य बदलले आहे.’

2019 मध्ये निहार आणि नीति यांचे लग्न झाले आणि लग्नाच्या 2 वर्षानंतर दोघेही पालक झाले. काही दिवसांपूर्वी नीतिबरोबरच्या त्याच्या प्रेमकथेविषयी बोलताना निहार म्हणाला होता, ‘मी आणि नीति आमचे खूप कॉमन मित्र होते. ती आणि तीचा मित्र एका बँडमध्ये होते. तो प्रत्येक वेळी म्हणायचा की, मी नीतिला भेटायला पाहिजे. त्याच्या लग्नातच आमची पहिली भेट झाली. तिला पाहिल्यावर मी ठरवलं होतं की, मी तिच्याशीच लग्न करेन. यानंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. नीतिबरोबर राहिल्यानंतर मला असे वाटते की, तिच्याशी लग्न करण्याचा माझा निर्णय योग्य होता.

दीपिका माझा भूतकाळ!

दीपिका पदुकोणला डेट केल्याविषयी बोलताना निहारने एकदा सांगितले की, ती आता केवळ त्याचा भूतकाळ आहे आणि तो तिला विसरला आहे. तो म्हणाला, मला याबद्दल काहीही बोलण्याची इच्छा नाही. निहारने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘मेरीगोल्ड’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. निहारला बॉलिवूडमध्ये यश मिळवता आले नाही. पण तो आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे.

(Nihar Pandya and Neeti Mohan share first photo of son Aryaveer on social media)

हेही वाचा :

Sherni Twitter Review : ‘शेरनी’ विद्या बालनला पुन्हा पडद्यावर पाहून चाहते आनंदी, वाचा नेटकरी काय म्हणतायत…

Photo : फिटनेस विथ राम गोपाल वर्मा, ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केले जिमधील फोटो

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें