Father’s Day: सुनील दत्त यांच्या आठवणीत संजय दत्त भावूक, स्पेशल पोस्टमध्ये लिहिलं, ‘तुम्ही माझी…’

संजय दत्तने करियरमध्ये अनेक चढ-उतार अनुभवले. बॉम्बस्फोट खटल्याचे दिवस तो कधीच विसरु शकणार नाहीत. या कठीण काळात त्याचे पिता सुनील दत्त एका खडकासारखे भक्कमपणे त्याच्यामागे उभे राहिलेत.

Father's Day: सुनील दत्त यांच्या आठवणीत संजय दत्त भावूक, स्पेशल पोस्टमध्ये लिहिलं, 'तुम्ही माझी...'
Sanjay and Sunil DuttImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 3:47 PM

आज फादर्स डे (Fathers Day) आहे. प्रत्येकजण आपआपल्यापरीने हा दिवस साजरा करतोय. फादर्स डेनिमित्त मुल वडिलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. सोशल मीडियावर अनेकांनी स्पेशल पोस्ट्स शेअर केल्या आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीही फादर्स डे साजरा करण्यात मागे नाहीत. प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त (Sanjay dutt) यानेसुद्धा वडील सुनील दत्त (Sunil Dutt) यांच्यासाठी सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट लिहिली आहे. संजय दत्तने करियरमध्ये अनेक चढ-उतार अनुभवले. बॉम्बस्फोट खटल्याचे दिवस तो कधीच विसरु शकणार नाहीत. या कठीण काळात त्याचे पिता सुनील दत्त एका खडकासारखे भक्कमपणे त्याच्यामागे उभे राहिलेत. त्याला आधार दिला. त्यामुळे आज फादर्स डेच्या निमित्ताने संजय त्यांचं स्मरण करताना भावूक झाला.

संजय दत्तने पोस्टमध्ये काय म्हटलंय?

संजय दत्तनेसुद्धा वडील सुनील दत्त आणि तिन्ही मुलांसह कोलाज फोटो शेअर करुन आजचा दिवस संस्मरणीय बनवला. “आय लव्ह यू डॅड, प्रत्येक छोटी गोष्ट जी तुम्ही माझ्यासाठी, कुटुंबासाठी केली त्याबद्दल Thank you. तुम्ही नेहमीच माझी ताकद, अभिमान आणि प्रेरणेचा स्त्रोत राहाल. मी तुमच्यासारख्या बेस्ट रोल मॉडेलचा मुलगा आहे, हे माझं नशीब आहे. मी भाग्यवान आहे. मला तुमच्यासारख पालक बनायचं आहे. सर्वच पित्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा” असं संजय दत्तने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

तासाभरात साराच्या फोटोला लाखो लाईक्स

प्रसिद्ध अभिनेत्री सारा आली खानने वडील सैफ अली खान आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत एक फोटो शेअर केलाय. फॅमिली लंच डेट आउटिंगचा हा फोटो आहे. साराने वडील सैफ अली खान यांना फादर्स डेच्या शुभेच्छा देताना ‘हॅप्पी फादर्स डे अब्बा जान’ असा मेसेज लिहिलाय. वडील आणि भावासोबतचा साराचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच भावला आहे. तासाभरातच या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत. साराच्या या फोटोआधी तिचे लंच आउटिंगचे आणखी सुद्धा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आपल्या दोन्ही मुलांसोबत सैफने लक्षात राहील, असा फादर्स डे साजरा केला.

अजून कोणी पोस्ट केली?

साराशिवाय करीना कपूर खान, श्वेता बच्चन नंदा, अजय देवगण, माधुरी दीक्षितसह अन्य सेलिब्रिटींनी सुद्धा फादर्स डे साठी खास पोस्ट केल्या आहेत. करीना कपूरने वडिल रणधीर कपूर यांच्यासोबत फोटो पोस्ट करुन त्यांना विश केलं आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.