AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पद्मिनी कोल्हापुरे प्रिन्स चार्ल्सच्या स्वागताला गेल्या.. आणि ब्रिटनमध्येही खळबळ उडाली! वाचा ‘या’ भेटीचा किस्सा!

सिनेमाच्या इतक्या वर्षांमध्ये, अशा अनेक गोष्टी घडून गेल्या, ज्या खूप चर्चेत आल्या. परंतु, आजच्या काळात बर्‍याच लोकांना कदाचित त्या गोष्टी माहित नसतील. असाच एक किस्सा अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरीसोबत (Padmini kolhapure) घडला, ज्याची ब्रिटनपर्यंत चर्चा झाली.

पद्मिनी कोल्हापुरे प्रिन्स चार्ल्सच्या स्वागताला गेल्या.. आणि ब्रिटनमध्येही खळबळ उडाली! वाचा ‘या’ भेटीचा किस्सा!
पद्मिनी कोल्हापुरे-प्रिन्स चार्ल्सच
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 9:03 AM
Share

मुंबई : बॉलिवूडच्या कॉरीडॉरमध्ये इतक्या गोष्टी आहेत की, जर प्रत्येकाची गुंफण करायची झाली तर, एक वेगळा मसाला चित्रपट तयार होईल. आजच्या काळात, घडलेल्या गोष्टी क्षणाचाही विलंब न होता सोशल मीडियावर पसरतात आणि काही काळ चर्चेत येतात. सिनेमाच्या इतक्या वर्षांमध्ये, अशा अनेक गोष्टी घडून गेल्या, ज्या खूप चर्चेत आल्या. परंतु, आजच्या काळात बर्‍याच लोकांना कदाचित त्या गोष्टी माहित नसतील. असाच एक किस्सा अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरीसोबत (Padmini kolhapure) घडला, ज्याची ब्रिटनपर्यंत चर्चा झाली.

प्रिन्स चार्ल्समुळे पद्मिनीचे नाव ब्रिटनमध्येही गाजले!

80च्या दशकातील सुपरहिट नायिका पद्मिनी कोल्हापुरीने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. तिला गायिका बनण्याची इच्छा होती, पण ती एक यशस्वी अभिनेत्री बनली. पद्मिनी ‘यादों की बारात’ आणि ‘दुश्मन दोस्त’ सारख्या काही चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून दिसली. यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण ‘प्रेम रोग’ हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील पहिला सुपरहिट चित्रपट ठरला. या चित्रपटामुळे पद्मिनीची गणना 80च्या दशकातील अव्वल नायिकांमध्ये होऊ लागली.

पद्मिनी हे बॉलिवूडच एक मोठं नाव होतं, त्यामुळे तिची प्रत्येक गोष्ट मीडिया आणि चाहत्यांच्या नजरेत येणे स्वाभाविक होते. 1980मध्ये प्रिन्स चार्ल्स भारत भेटीला आले होते. तेव्हा त्यांना अचानक बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग बघावे असे वाटले. अशा परिस्थितीत, प्रिन्स चार्ल्स यांना मुंबईतील एका स्टुडिओमध्ये नेण्यात आले. हा राजकमल स्टुडिओ होता, जिथे पद्मिनी ‘अहिस्ता-अहिस्ता’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. जेव्हा, तिला प्रिन्स चार्ल्सच्या आगमनाची माहिती मिळाली, तेव्हा ती स्वतः त्यांना भेटायला गेली.

प्रिन्सचं स्वागत करायला गेली अन्…

यावेळी अभिनेत्री शशिकला देखील सेटवर उपस्थित होत्या. त्याने प्रिन्स चार्ल्सची आरती केली. मात्र, पद्मिनी कोल्हापुरीने राजकुमाराचे स्वागत करत, त्यांच्या गालावर चुंबन घेताना पुष्पहार घातला. यावेळी अभिनेत्रीची ही गोष्ट लोकांच्या नजरेत आली. त्यावेळी एखाद्या अभिनेत्रीने एखाद्याला असेच चुंबन घेणे सामान्य नव्हते. पडद्यावरही खूप कमी चुंबन दृश्ये चित्रीत केली जात होरी. अशा परिस्थितीत, लोकांना पद्मिनीचे हे पाऊल अगदी धाडसी वाटले. त्याच वेळी, प्रिन्स चार्ल्सचे लग्न देखील झाले नव्हते. अशा परिस्थितीत या दोघांच्या नावाची बरीच चर्चा रंगली.

ब्रिटनमध्येही चर्चा!

भारतात घडलेला हा किस्सा इतका चर्चिला गेला की, त्याची चर्चा ब्रिटनपर्यंत पोहोचली. या सर्व गोष्टी पद्मिनी कोल्हापुरीसाठी मात्र डोकेदुखी ठरल्या. एका मुलाखतीत याचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले होते की, या चुंबनामुळे त्यांना खूप लाजिरवाणे देखील व्हावे लागले होते. अभिनेत्री म्हणाली होती की, ‘एकदा या घटनेनंतर मी यूकेला गेलो होते, जिथे इमिग्रेशन ऑफिसरने मला विचारले की, तुम्हीच का त्या प्रिन्स चार्ल्सला किस करणाऱ्या?’

पद्मिनी म्हणाली की, ती एक छोटीसी कीस होती, जी परदेशात इतकी मोठी गोष्ट नाही. पण, त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर पद्मिनीने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट केले. असे म्हटले जाते की तिला ‘राम तेरी गंगा मैली’ मध्ये मुख्य भूमिका करण्याची ऑफर देखील मिळाली होती, पण बोल्ड दृश्यांमुळे तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. पद्मिनी आता चित्रपट विश्वापासून दूर राहते.

(Padmini Kolhapure went to welcome Prince Charles with kiss becomes a huge fuss in that era)

हेही वाचा :

मराठमोळी अभिनेत्री-युट्युबर उर्मिला निंबाळकरच्या आयुष्यात हिरोची एण्ट्री

‘व्हेकेशन मूड’, बिकिनी परिधान करून ‘संजू बाबा’ची लाडकी त्रिशाला जंगलात डायनासोरच्या शोधात!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.