AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जवान चित्रपटातीच्या सेटवरील फोटो लीक, तोंडात सिगारेट, चेहऱ्यावर पांढऱ्या पट्टया, शाहरुख खान याचे लूक पाहून चाहते

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट ठरला, या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. आता शाहरुख खान हा त्याच्या दुसऱ्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झालाय.

जवान चित्रपटातीच्या सेटवरील फोटो लीक, तोंडात सिगारेट, चेहऱ्यावर पांढऱ्या पट्टया, शाहरुख खान याचे लूक पाहून चाहते
| Updated on: Mar 11, 2023 | 8:02 PM
Share

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर तूफान कामगिरी करताना दिसला. विशेष म्हणजे या चित्रपटाने बाहुबलीचा रेकाॅर्ड देखील मोडलाय. आता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट बाॅलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. मुळात म्हणजे शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेल्यानंतर तो मोठ्या पडद्यापासून गायबच झाला. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहात होते. शेवटी शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून धमाकेदार पध्दतीने पुनरागमन केले.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. सोशल मीडियावर चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळत होते. मात्र, या वादाचा फायदा चित्रपटाला झाल्याचे दिसत आहे.

शाहरुख खान याच्या चित्रपटाने धमाका केल्यानंतर आता शाहरुख खान याने आपला मोर्चा आगामी चित्रपटाकडे वळवला आहे. शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी जवान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाच्या सेटवरील एक काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यामध्ये शाहरुख खान याचा लूक जबरदस्त दिसतोय. शाहरुख खान याचा हा लूक बघितल्यानंतर हा चित्रपट देखील पठाण चित्रपटाप्रमाणेच बाॅक्स आॅफिसवर ब्लॉक बस्टर ठरणार असल्याचे चाहते म्हणताना दिसत आहेत. या चित्रपटातील शाहरुख खान याचा लूक बघितल्यानंतर त्याच्या चाहत्यांमधील उत्साह चांगलाच वाढल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हातात बेल्ट घेऊन गुंडांना मारहाण करताना दिसत आहे. त्याचा चेहरा पांढर्‍या पट्टीने झाकलेला दिसत आहे आणि त्याच्या तोंडामध्ये सिगारेट आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये शाहरुख खान याच्या चेहऱ्यावर पांढऱ्या पट्टया दिसत आहेत. शाहरुख खान याच्या पात्राचा अंदाजा लागत आहे. जवान चित्रपटाच्या अगोदर शाहरुख खान याने डंकी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत लकी ठरले आहे. कारण याच वर्षात सर्वाधिक कमाई करणारा त्याचा पठाण हा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने बाहुबलीचा रेकाॅर्ड देखील तोडलाय. शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान हे देखील याच वर्षी बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. यामुळेच शाहरुख खान याच्यासाठी हे वर्ष अत्यंत खास ठरले आहे.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.