AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुष्पा भाऊची पुन्हा जेलमध्ये रवानगी? तेलंगणा पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या

‘पुष्पा 2’च्या प्रिमियरवेळी एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती, या प्रकरणात आता मोठी बामती समोर येत आहे.

पुष्पा भाऊची पुन्हा जेलमध्ये रवानगी? तेलंगणा पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या
| Updated on: Dec 17, 2024 | 9:48 PM
Share

‘पुष्पा 2’च्या प्रिमियरवेळी एका महिलेचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुनला मिळालेल्या जामिनाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी तेलंगणा पोलीस आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिअटरमध्ये ‘पुष्पा 2: द रूल ‘ चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिला मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी 13 डिसेंबरला अल्लू अर्जुला अटक केली होती. 4 डिसेंबरला चित्रपटाच्या प्रिमियरवेळी हैदराबादमध्ये असलेल्या संध्या थिअरटरमध्ये अभिनेता अल्लू अर्जुन हा संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांच्यासोबत अचानक पोहोचला. त्यानंतर तीथे त्याच्या फॅन्सनी मोठी गर्दी केली,गोंधळ उडाल्यानं चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता.तर एक 9 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता.

या प्रकरणात 13 डिसेंबरला अल्लू अर्जुला पोलिसांनी अटक केलं होतं. अल्लू अर्जुनला त्याच्या हैदराबाद येथील घरातून अटक करण्यात आली. अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. तिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर अल्लू अर्जुने आपल्या वकिलाच्या मदतीने हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला आणि त्याला जामीन मिळाला.त्याला चार आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. ज्या दिवशी अटक झाली त्याच दिवशी त्याला जामीन मिळाला, मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्याला ती रात्र जेलमध्येच काढावी लागली, दुसऱ्या दिवशी त्याची सुटका झाली.

मात्र आता समोर आलेल्या माहितीनसुार अल्लू अर्जुन याला मिळालेल्या जामिनाच्याविरोधात तेलंगणा पोलीस सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. अल्लू अर्जुन याचा जमीन रद्द झाला तर पुन्हा एकदा त्याची रवानगी जेलमध्ये होऊ शकते.

दरम्यान अल्लू अर्जुनला तेलंगणा पोलिसांनी ज्या पद्धतीने अटक केलं होतं,  त्यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्याने संताप व्यक्त केला. मला माझ्या बेडरूमध्ये घुसून अटक करण्यात आली, मला नाष्टा देखील करू दिला नाही, कपडेही घालू दिले नाहीत, असलं अलू अर्जुने यांने म्हटलं.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...