स्पेनमध्ये Prabhasवर सर्जरी, शूटिंगदरम्यान झाली होती दुखापत; चाहते करतायत प्रार्थना

स्पेनमध्ये Prabhasवर सर्जरी, शूटिंगदरम्यान झाली होती दुखापत; चाहते करतायत प्रार्थना
अभिनेता प्रभास
Image Credit source: Facebook

'बाहुबली' फेम प्रभासचा (Prabhas) 'राधेश्याम' (Radhe Shyam) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रभासच्या या बिग बजेट चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणि त्याच्याशी निगडीत प्रमोशनचं काम झाल्यानंतर प्रभासने ब्रेक घेतला आहे. तो सध्या स्पेनमध्ये (Spain) असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

स्वाती वेमूल

|

Mar 19, 2022 | 4:16 PM

‘बाहुबली’ फेम प्रभासचा (Prabhas) ‘राधेश्याम’ (Radhe Shyam) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रभासच्या या बिग बजेट चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणि त्याच्याशी निगडीत प्रमोशनचं काम झाल्यानंतर प्रभासने ब्रेक घेतला आहे. तो सध्या स्पेनमध्ये (Spain) असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. स्पेनमधील बार्सीलोना याठिकाणी प्रभासवर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. सालार या त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक अपघात झाला होता. यावेळी प्रभासला दुखापत झाली होती. डॉक्टरांनी सध्या त्याला पूर्णवेळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे. अनेकदा कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे कलाकारांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येतन नाही. मात्र त्याचा परिणाम नंतर भोगावा लागतो. असंच काहीसं प्रभाससोबत घडलंय. सालारच्या शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीकडे प्रभासने दुर्लक्ष केलं. आता त्याच दुखापतीचा त्रास वाढल्याने प्रभासला सर्जरीसाठी (Prabhas Surgery) स्पेनला जावं लागलं.

‘राधेश्याम’ हा चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने माध्यमांपासून दूर जाण्यासाठी प्रभास स्पेनला गेला, असं काहींचं म्हणणं होतं. मात्र चित्रपटाच्या अपयशामुळे नाही तर सर्जरीसाठी तो तिथं गेल्याचं समोर आलं आहे. प्रेक्षक-समीक्षकांकडून जरी संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी ‘राधेश्याम’ने आतापर्यंत 185 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

राधाकृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडे, सचिन खेडेकर, जगपती बाबू, मुरली शर्मा, भाग्यश्री यांच्या भूमिका आहेत. प्रभास लवकरच ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो रामाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. तर सैफ अली खान ही रावणाच्या भूमिकेच दिसेल. या चित्रपटात क्रिती सनॉन आणि सनी सिंग यांच्याही भूमिका आहेत. तर ‘सालार’ या चित्रपटात तो श्रुती हासनसोबत काम करणार आहे. ‘केजीएफ’चे दिग्दर्शक प्रशांत नील या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

हेही वाचा: 

अनुष्का शर्माने घेतला मोठा निर्णय; भाऊ कर्नेशवर सर्व जबाबदारी सोपवत म्हणाली…

‘जय संतोषी माँ’बाबत जे घडलं तेच 47 वर्षांनंतर The Kashmir Files बाबत घडतंय; पुन्हा घडणार इतिहास?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें