अनुष्का शर्माने घेतला मोठा निर्णय; भाऊ कर्नेशवर सर्व जबाबदारी सोपवत म्हणाली…

अनुष्का शर्माने घेतला मोठा निर्णय; भाऊ कर्नेशवर सर्व जबाबदारी सोपवत म्हणाली...
अभिनेत्री अनुष्का शर्मा
Image Credit source: Instagram

अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) ऑक्टोबर 2013 मध्ये तिचा भाऊ कर्नेश शर्मासोबत मिळून ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ (Clean Slate Filmz) नावाची निर्मिती कंपनी (Production House) सुरू केली. या बॅनरअंतर्गत अनुष्काने ‘NH 10’, ‘फिलौरी’, ‘परी’ यांसारख्या चित्रपटांची आणि ‘पाताल लोक’ या वेब सीरिजची निर्मिती केली. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटानंतर अनुष्काने चित्रपटांमधून काही काळ ब्रेक […]

स्वाती वेमूल

|

Mar 19, 2022 | 3:36 PM

अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) ऑक्टोबर 2013 मध्ये तिचा भाऊ कर्नेश शर्मासोबत मिळून ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ (Clean Slate Filmz) नावाची निर्मिती कंपनी (Production House) सुरू केली. या बॅनरअंतर्गत अनुष्काने ‘NH 10’, ‘फिलौरी’, ‘परी’ यांसारख्या चित्रपटांची आणि ‘पाताल लोक’ या वेब सीरिजची निर्मिती केली. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटानंतर अनुष्काने चित्रपटांमधून काही काळ ब्रेक घेतला. जानेवारी 2021 मध्ये तिने मुलीला जन्म दिला. आई झाल्यानंतर अनुष्काने पुन्हा एकदा तिच्या कामाला सुरुवात केली आणि आता ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकीकडे आईची जबाबदारी आणि दुसरीकडे अभिनय अशा दोन्ही गोष्टी सांभाळत अनुष्काने तिच्या निर्मिती संस्थेसाठी काम केलं. मात्र आता अभिनयावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने मोठा निर्णय घेतला आहे. अनुष्काने ‘क्लीन स्लेट फिल्म्स’मधून काढता पाय घेतला आहे आणि त्याची सर्व जबाबदारी तिने तिच्या भावावर सोपवली आहे. याविषयीची माहिती तिने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे.

अनुष्का शर्माची पोस्ट-

‘जेव्हा मी माझ्या भावासोबत मिळून क्लीन स्लेट फिल्म्स ही निर्मिती संस्था सुरू केली, तेव्हा आम्हा दोघांनाही या क्षेत्राचा फारसा अनुभव नव्हता. पण काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द होती. आता या प्रवासाकडे जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा सर्व अडचणींवर मात करून आम्ही मिळवलेल्या यशाबद्दल मला अभिमान वाटतो. व्यावसायिक प्रोजेक्ट्स वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा माझा मानस होता. तर ही कंपनी आता ज्या ठिकाणी उभी आहे, तिथपर्यंत आणण्यासाठी कर्नेशचा त्यात मोठा वाटा आहे. आई झाल्यानंतरही मी अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे आणि या दोन्ही जबाबादाऱ्यांमध्ये संतुलन राखण्यासाठी मला तारेवरची कसरत करावी लागतेय. त्यामुळे माझ्याकडे जो काही वेळ आहे, तो मी माझ्या पहिल्या प्रेमासाठी म्हणजेच अभिनयासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच मी क्लीन स्लेट फिल्म्समधून काढता पाय घेत आहे. कर्नेश त्याची जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करेल, असा माझा ठाम विश्वास आहे. या कंपनीला आणि कर्नेशला माझी साथ नेहमीच असेल. भविष्यात मी या निर्मिती संस्थेच्या बॅनरअंतर्गत काम करण्यास उत्सुकदेखील आहे. क्लीन स्लेट फिल्म्सच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा’, अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्का तिच्या आगामी ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटात भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. चकद एक्स्प्रेस या नावानं झुलन गोस्वामी प्रसिद्ध आहे. जगातील सगळ्यात वेगवान महिला गोलंदाजांपैकी ती एक मानली जाते. 2020 च्या सुरुवातीला झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याची चर्चा होती. ईडन गार्डन्स मैदानावर या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटोज देखील व्हायरल झाले होते. ज्यामध्ये अनुष्का निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये दिसून आली होती. त्यानंतर चित्रपटाविषयी फार काही चर्चा झाली नाही. परंतु आता पुन्हा एकदा अनुष्काचे निळ्या जर्सीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

हेही वाचा:

‘जय संतोषी माँ’बाबत जे घडलं तेच 47 वर्षांनंतर The Kashmir Files बाबत घडतंय; पुन्हा घडणार इतिहास?

‘अरुंधती’च्या लेकीच्या वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें