Jaani Johan: ‘मी समोर अक्षरश: मृत्यू पाहिला’; भीषण अपघातानंतर गायक जानी जोहानची पोस्ट, रस्त्यावर तीन वेळा पलटली SUV कार

ही टक्कर इतकी जोरात होती की SUV तीनदा पलटी झाली. सुदैवाने एअर बॅग्समुळे प्रवाशांचे प्राण वाचले. गाडीतून तीन जणांना तातडीने बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना मोहालीतील फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Jaani Johan: 'मी समोर अक्षरश: मृत्यू पाहिला'; भीषण अपघातानंतर गायक जानी जोहानची पोस्ट, रस्त्यावर तीन वेळा पलटली SUV कार
भीषण अपघातानंतर गायक जानी जोहानची पोस्ट
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 20, 2022 | 1:42 PM

पंजाबी गायक (Punjabi singer) आणि गीतकार जानी जोहान (Jaani Johan) याच्या गाडीचा मंगळवारी संध्याकाळी भीषण अपघात (road accident) झाला. मोहालीच्या सेक्टर 22 मध्ये दुसऱ्या वाहनाने धडक दिल्यानंतर या अपघातात जानीची एसयुव्ही कार पलटी झाली होती. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातानंतर जानीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तब्येतीची माहिती दिली. ‘आज मी अक्षरश: मृत्यू पाहिला आणि नंतर देवाचं दर्शन झालं. मृत्यू आणि देव या दोघांना एकत्रच मी पाहिलं. मी आणि माझे मित्र ठीक आहोत’, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय. या भीषण अपघातात जानी आणि त्याचे मित्र थोडक्यात बचावले. जानीसह त्याच्या मित्रांना थोडीफार दुखापत झाली. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जानीने त्याच्या आणखी एका पोस्टमध्ये लिहिलं, “देवाच्या कृपेने अपघातावेळी कारमध्ये आम्ही जेवढे लोक होतो, ते सर्वजण ठीक आहोत. अधिकारी या प्रकरणात योग्य तो तपास करत आहेत आणि आम्हाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. वाहेगुरु ने राख ले. वाहेगुरु दा शुक्र है (देवाचे आभार).” जानीने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्याला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री गौहर खान, असीस कौर, स्टेबिन बेन, एमी विर्क, रवी दुबे, कनिका कपूर आणि सोफी चौधरी यांसारख्या सेलिब्रिटींनीही या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

अपघातानंतर जानी जोहानची पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by JAANI (@jaani777)

अपघाताबद्दल बोलताना सोहाना स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) म्हणाले की, “जानीसह तिघं जण सेक्टर 91 च्या दिशेने जात असताना संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जेव्हा ते सेक्टर 88 लाइट पॉइंटवर पोहोचले तेव्हा फोर्ड फिगोने त्यांच्या एसयूव्हीला धडक दिली. त्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं. ही टक्कर इतकी जोरात होती की SUV तीनदा पलटी झाली. सुदैवाने एअर बॅग्समुळे प्रवाशांचे प्राण वाचले. गाडीतून तीन जणांना तातडीने बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना मोहालीतील फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आलं.”

जानी हा पंजाब आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि गीतकार आहे. तितलियाँ, नाह, पछताओगे, धोकेबाज, क्या बात है, फिलहाल, फिलहाल 2 यांसारख्या गाण्यांसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने बी प्राक, हार्डी संधू, जस्सी गिल आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत काम केलं आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें