Video | ‘याच्याशी लग्न करू नकोस…’, रणबीरचं ‘ते’ कृत्य पाहून संतापलेल्या चाहत्यांचा आलियाला सल्ला!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे बॉलिवूडचे पॉवर कपल मानले जाते. दोघांचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. पण, मागील दोन वर्षांपासून त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Video | ‘याच्याशी लग्न करू नकोस...’, रणबीरचं ‘ते’ कृत्य पाहून संतापलेल्या चाहत्यांचा आलियाला सल्ला!
Ranbir-Alia

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे बॉलिवूडचे पॉवर कपल मानले जाते. दोघांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. पण, मागील दोन वर्षांपासून त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकदा दोघेही एकमेकांवरील प्रेम मोकळेपणाने व्यक्त करताना दिसतात. लवकरच दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचेही बोलले जात आहे.

मात्र, दरम्यान, काही काळापूर्वी आलिया आणि रणबीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक यूजर्स संतापले आहेत आणि आलियाला रणबीरसोबत ब्रेकअप करण्यास सांगत आहेत.

रणबीरवर संतापले चाहते!

खरंतर दिवाळीच्या मुहूर्तावर आलिया आणि रणबीर एकत्र दिसले होते. यावेळी आलियाने जांभळ्या रंगाचा सब्यसाची लेहेंगा परिधान केला होता. तर, यावेळी रणबीर देखील एम्ब्रॉयडरी कुर्त्यामध्ये खूपच सुंदर दिसत होता. त्याचे फोटो आणि व्हिडीओही अजूनही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, यातीलच  एक व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला असून, तो पाहिल्यानंतर चाहते रणबीरवर नाराजी व्यक्त करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आलिया पायऱ्यांवरून उतरत असताना तिचा दुपट्टा मागेच राहतो आणि रणबीर दुपट्टा हाताने बाजूला करण्याऐवजी लाथ मारून बाजूल काढतो. आता युजर्सनी आलियाबाबत रणबीरच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, रणबीर आलियाचा आदर करत नाही आणि पुढेही कधी तिचा आदर करू शकत नाही. अनेकांनी असेही म्हटले आहे की, आलियाने लग्नापूर्वीच रणबीरसोबत ब्रेकअप करावे.

लग्नाच्या प्लॅनला पुन्हा ब्रेक!

या जोडप्याच्या लग्नाबाबतच्या आधीच्या बातम्यांनुसार, दोघेही यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार होते. मात्र, आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, या जोडप्याने त्यांचे लग्न जवळपास एक वर्ष म्हणजे डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलले आहे.

रणबीर आणि आलियाच्या या निर्णयामागे एक मोठे कारण सांगितले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि आलिया दोघेही या वर्षी सतत आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहेत. अशा परिस्थितीत दोघांनीही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हा निर्णय घेतला आहे.

करिअरही महत्त्वाचं!

रणबीरने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो लग्नासाठी तयार आहे आणि जर कोरोना आला नसता तर त्याने एव्हाना लग्न केले असते. लग्नाच्या प्रश्नावर आलिया नेहमीच हो म्हणताना दिसत असली, तरी तिला आता तिचं करिअर देखील महत्त्वाचं वाटत आहे. अशा परिस्थितीत दोघांनी लग्नाच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा :

Video | Oops Moment! चाहत्यांचे आभार मानत होती गायिका अन् अचानक खांद्यावरून ड्रेसच निसटला!

Happy Birthday Boman Irani | वेटर ते फोटोग्राफर, 42व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत बोमन इराणी बनले सुपरस्टार!


Published On - 1:19 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI