Ranbir Kapoor: “बाळाच्या जन्मानंतर मी त्यांच्यासोबतच बसेन”; पापाराझींविषयी रणबीरची भन्नाट प्रतिक्रिया

"माझ्या बंगल्याबाहेर केपर्स होते आणि ते 24 तास त्यांचे कॅमेरे घेऊन तिथे लपून बसायचे. ते माझा पाठलागसुद्धा करायचे", असं रणबीर आरजे स्तुतीच्या चॅट शोमध्ये म्हणाला.

Ranbir Kapoor: बाळाच्या जन्मानंतर मी त्यांच्यासोबतच बसेन; पापाराझींविषयी रणबीरची भन्नाट प्रतिक्रिया
पापाराझींविषयी रणबीरची भन्नाट प्रतिक्रियाImage Credit source: Manav Manglani
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 12:36 PM

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि त्याची पत्नी आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या आयुष्यात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. आगामी ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतींमध्ये तो याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. मात्र पापाराझींसमोर (paparazzi) तो फारसा कधी बोलताना दिसत नाही. पापाराझींपासून लांब राहणंच तो पसंत करतो. अशातच जेव्हा बाळ होईल, तेव्हा पापाराझींना तो कसा सामोरं जाईल, याविषयी त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. “माझ्या बंगल्याबाहेर केपर्स होते आणि ते 24 तास त्यांचे कॅमेरे घेऊन तिथे लपून बसायचे. ते माझा पाठलागसुद्धा करायचे”, असं रणबीर आरजे स्तुतीच्या चॅट शोमध्ये म्हणाला.

“माझे त्यांच्याशी प्रेम-द्वेषाचं नातं आहे. मला वाटतं की ते माझं गुपित उघड करत आहेत, म्हणून मी देखील त्यांच्याबरोबर लपाछपी खेळली पाहिजे. माझ्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूकसुद्धा होते. मी म्हणायचो गाडी इथे पार्क करा आणि त्यांना कळण्याआधीच निघून जायचो. मागच्या दारातून मी निघून जायचो आणि ते तासनतास माझी वाट पाहत बसायचे. जर ते माझ्यासोबत खेळत असतील तर मी सुद्धा त्यांच्यासोबत असं काही खेळू शकतो,” असं रणबीरने सांगितलं. मात्र त्यांच्या कामाचं स्वरुपच तसं असल्याचं रणबीरने मान्य केलं.

हे सुद्धा वाचा

बाळाच्या आगमनानंतर मीडियाचं लक्ष तो कशापद्धतीने हाताळेल याबद्दल विचारले असता तो पुढे म्हणाला, “मला वाटतं की मी त्यांच्यासोबतच गप्पा मारत बसेन. ते खूप चांगले लोक आहेत आणि जर तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारायला बसलात तर ते तुमच्याबद्दल काहीतरी अर्थपूर्ण बोलून जातात. मला काय म्हणायचं आहे हे त्यांना नीट समजलं असेल.”

14 एप्रिल रोजी रणबीर आणि आलियाने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या अडीच महिन्यानंतर आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. या दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. आलिया 29 वर्षांची असून रणबीर 39 वर्षांचा आहे. रणबीरच्या वयामुळे दोघांनी फॅमिली प्लॅनिंग लवकर केल्याचं म्हटलं जात आहे. आलियाने आई झाल्यानंतर तिच्या स्वप्नांचा त्याग करावा अशी माझी अजिबात इच्छा नाही, असंही रणबीरने याआधीच्या मुलाखतींमध्ये स्पष्ट केलं होतं. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना रणबीर म्हणालेला, “आलिया ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी स्टार आहे आणि मूल झाल्यानंतर तिने तिच्या स्वप्नांचा त्याग करावा असं मला वाटत नाही. त्यामुळे आमच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात समतोल साधता यावा यासाठी आम्हाला योग्य ती योजना करावी लागेल. हे सर्व टप्प्याटप्प्याने करावं लागेल. पण त्यासाठी मी खूप सकारात्मक आहे.”

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.