Ranbir Kapoor: रणबीरने व्यक्त केली पिता होण्याबाबतची चिंता; “माझा मुलगा जेव्हा 20 वर्षांचा असेल तेव्हा..”

रणबीरच्या वयामुळे दोघांनी फॅमिली प्लॅनिंग (Family Planning) लवकर केल्याचं म्हटलं जात आहे. आगामी 'शमशेरा' या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर या विषयावर पुन्हा एकदा व्यक्त झाला.

Ranbir Kapoor: रणबीरने व्यक्त केली पिता होण्याबाबतची चिंता; माझा मुलगा जेव्हा 20 वर्षांचा असेल तेव्हा..
Ranbir Kapoor: रणबीरने व्यक्त केली पिता होण्याबाबतची चिंता
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 19, 2022 | 10:06 AM

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच पिता बनणार आहे. आयुष्यात येणाऱ्या या नव्या टप्प्याबद्दल तो विविध मुलाखतींमध्ये मोकळेपणे बोलताना दिसत आहे. 14 एप्रिल रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या अडीच महिन्यानंतर आलियाने (Alia Bhatt) गरोदर असल्याचं जाहीर केलं. या दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. आलिया 29 वर्षांची असून रणबीर 39 वर्षांचा आहे. रणबीरच्या वयामुळे दोघांनी फॅमिली प्लॅनिंग (Family Planning) लवकर केल्याचं म्हटलं जात आहे. आगामी ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर या विषयावर पुन्हा एकदा व्यक्त झाला. शमशेरा या चित्रपटात रणबीरसोबत अभिनेत्री वाणी कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. कोणत्या वयात आपल्याला मुलं झाली पाहिजेत असं तुला वाटतं, असा प्रश्न रणबीर सेटवर विचारत असल्याचं वाणीने या मुलाखतीत सांगितलं.

रणबीर म्हणाला की “माणूस चाळीशीत पोहोचतो तेव्हा त्याला असेच विचार येतात. तुम्ही या गोष्टींचाही विचार करू लागता की यार माझा मुलगा जेव्हा 20 वर्षांचा होईल तेव्हा मी 60 वर्षांचा असेन. मला त्याच्यासोबत कुठलाही खेळ खेळता येईल का, ट्रेकला जाता येईल का? पण मी खूपच उत्सुक आहे. मी माझ्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची वाट पाहतोय. आलिया आणि मी बऱ्याच गोष्टींचं नियोजन केलंय. पण एका वेळी एक पाऊल टाकत आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

रणबीर-आलिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

आलियाने आई झाल्यानंतर तिच्या स्वप्नांचा त्याग करावा अशी माझी अजिबात इच्छा नाही, असंही रणबीरने याआधीच्या मुलाखतींमध्ये स्पष्ट केलं होतं. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना रणबीर म्हणालेला, “आलिया ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी स्टार आहे आणि मूल झाल्यानंतर तिने तिच्या स्वप्नांचा त्याग करावा असं मला वाटत नाही. त्यामुळे आमच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात समतोल साधता यावा यासाठी आम्हाला योग्य ती योजना करावी लागेल. हे सर्व टप्प्याटप्प्याने करावं लागेल. पण त्यासाठी मी खूप सकारात्मक आहे.”

14 एप्रिल 2022 रोजी आलिया आणि रणबीर कपूरचं लग्न झालं. लग्नाच्या अडीच महिन्यांनंतर आलियाने गरोदरपणाची गोड बातमी दिली. आलिया आणि रणबीर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघंही आता ‘ब्रह्मास्त्र-पार्ट 1’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें