Ranbir Alia: “आलियाने बाळासाठी तिच्या स्वप्नांचा त्याग करावा असं मला वाटत नाही”, रणबीरच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

कपूर घराण्याबद्दल एक गोष्ट नेहमीच बोलली जाते की, मुलगी असो किंवा नायिका त्या कुटुंबाची सून बनली तर ती लग्नानंतर चित्रपटात काम करत नाही. लग्नानंतर करिश्मा आणि करीनाची आई बबिता यांनीही चित्रपटसृष्टी सोडली. तसंच रणबीरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनीसुद्धा लग्नानंतर इंडस्ट्रीला रामराम केला.

Ranbir Alia: आलियाने बाळासाठी तिच्या स्वप्नांचा त्याग करावा असं मला वाटत नाही, रणबीरच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं
रणबीरच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 5:48 PM

कपूर घराण्याबद्दल एक गोष्ट नेहमीच बोलली जाते की, मुलगी असो किंवा नायिका त्या कुटुंबाची सून बनली तर ती लग्नानंतर चित्रपटात काम करत नाही. लग्नानंतर करिश्मा आणि करीनाची आई बबिता यांनीही चित्रपटसृष्टी सोडली. तसंच रणबीरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनीसुद्धा लग्नानंतर इंडस्ट्रीला रामराम केला. जेव्हा आलियाने रणबीर कपूरशी (Ranbir Kapoor) लग्न केलं आणि कपूर कुटुंबाची सून झाली, तेव्हा तिच्या करिअरबद्दलही अशाच प्रकारच्या चर्चा होत्या. आता आलिया (Alia Bhatt) लवकरच आई होणार आहे. कपूर कुटुंबात चिमुकला पाहुणा येणार याबद्दल रणबीरसुद्धा खूप खूश आहे. परंतु आलियाने आई झाल्यानंतर तिच्या स्वप्नांचा त्याग करावा अशी त्याची अजिबात इच्छा नाही. रणबीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पालकत्वाविषयी सांगितलं. आयुष्याच्या या नव्या टप्प्यासाठी तो आणि आलिया भट्ट कशी तयारी करत आहेत हे त्याने सांगितलं.

‘मुलासाठी आलियाने स्वप्नांचा त्याग करावा असं मला वाटत नाही’

‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना रणबीर म्हणाला, “आलिया ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी स्टार आहे आणि मूल झाल्यानंतर तिने तिच्या स्वप्नांचा त्याग करावा असं मला वाटत नाही. त्यामुळे आमच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात समतोल साधता यावा यासाठी आम्हाला योग्य ती योजना करावी लागेल. हे सर्व टप्प्याटप्प्याने करावं लागेल. पण त्यासाठी मी खूप सकारात्मक आहे.”

हे सुद्धा वाचा

‘माझे वडील व्यस्त असायचे, त्यांच्याकडे वेळ नसायचा, पण मी असं करणार नाही’

“आई-बाबा म्हणून जबाबदाऱ्या कशा सांभाळायच्या, कामाची वाटणी कशी करायची याबद्दल मी आणि आलिया बोलत असतो. माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील कामात खूप व्यस्त असायचे. त्यांना माझ्यासाठी फार वेळ नव्हता. त्यामुळे मी नेहमी आईसोबतच असायचो. पण माझ्या मुलाशी माझं खूप वेगळं नातं असेल”, असं रणबीरने सांगितलं.

इन्स्टा फोटो-

रणबीर कपूरने एका ग्रुप इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की, ‘शमशेरा’च्या प्रमोशनदरम्यान त्याला वडील बनण्याबाबत प्रश्न विचारले जातील याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्याने आणि आलियाने आधीच मॉक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तयारी केली होती. रणबीर म्हणाला, “मी यासाठी आलियासोबत खूप रिहर्सल केली होती. आलिया मला प्रश्न विचारायची आणि मी त्याची उत्तरं द्यायचो. सर तुम्ही लवकरच बाबा होणार आहात, तुम्हाला कसं वाटतंय, यांसारखे प्रश्न ती विचारायची. पण हे फक्त शब्द आहेत. खरं तर कसं वाटतं हे शब्दांत मांडता येत नाही. मी खूप आनंदी आहे. मी उत्साही आणि त्यासोबत थोडाफार चिंतेतही आहे. त्याच वेळी मला भीतीदेखील वाटते. काय होत आहे, काय होणार आहे, हे खूप वेगाने होत आहे का, यासाठी आपण तयार आहोत का, मी माझ्या बाळाला नीट काळजी घेऊ शकेन का, असे असंख्य प्रश्न आहेत. मी यासाठी करण मल्होत्राकडून टिप्स घेत आहे. कारण तोसुद्धा नुकताच पिता बनला आहे.”

14 एप्रिल 2022 रोजी आलिया आणि रणबीर कपूरचं लग्न झालं. लग्नाच्या अडीच महिन्यांनंतर आलियाने गरोदरपणाची गोड बातमी दिली. आलिया आणि रणबीर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघंही आता ‘ब्रह्मास्त्र-पार्ट 1’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.