Raqesh Bapat & Shamita Shetty: राकेश बापट-शमिता शेट्टीचं ब्रेकअप; वर्षभरही टिकलं नाही नातं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 27, 2022 | 11:01 AM

बिग बॉसच्या शोमध्ये राकेश आणि शमिता एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघंही हा शो जिंकले नसले तरी अफेअरमुळे ते सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिले.

Raqesh Bapat & Shamita Shetty: राकेश बापट-शमिता शेट्टीचं ब्रेकअप; वर्षभरही टिकलं नाही नातं
Raqesh Bapat & Shamita Shetty
Image Credit source: Instagram

बिग बॉस (Bigg Boss) ओटीटीमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty). या दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. बिग बॉसच्या शोमध्ये राकेश आणि शमिता एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघंही हा शो जिंकले नसले तरी अफेअरमुळे ते सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिले. मात्र या दोघांचं नातं वर्षभरही टिकलं नाही. राकेश आणि शमिता यांनी अधिकृतपणे ते आता एकत्र नसल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत्या. अखेर राकेशने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून शमितासोबत ब्रेकअप केल्याचं जाहीर केलं.

राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांचं नातं वर्षभरही टिकलं नाही. राकेशने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलं, ‘आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मी आणि शमिता आता एकत्र नाही. मी कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी आम्ही एकमेकांना भेटलो. आम्हाला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी दोघांच्या चाहत्यांचे खूप आभार मानतो. मला माझं आयुष्य खासगीत जगायला आवडतं. मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसा व्यक्त होत नाही. मात्र आम्हाला ब्रेकअपबद्दल चाहत्यांना अधिकृतपणे माहिती द्यायची होती. ही बाब तुम्हाला माहित असायला हवं असं आम्हाला वाटत होतं. आम्हाला माहित आहे की तुम्हाला हे ऐकून अजिबात चांगलं वाटणार नाही. मात्र तरीही तुमचं प्रेम आणि तुमचा पाठिंबा आम्हाला देत राहा.’

राकेश बापटची पोस्ट

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये शमिताला पाठिंबा देण्यासाठी राकेश सहभागी झाला होता. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरही शमिताच्या वाढदिवशी दोघांना एकत्र पाहण्यात आलं होतं. राकेशला पुण्यात राहायचं होतं आणि शमिताला हे मान्य नव्हतं अशा चर्चा होत्या. यामुळे दोघांमध्ये मतभेद झाले. मध्यंतरीच्या काळात दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र इतक्यात लग्नाचा निर्णय घेणार नसल्याचं शमिताने स्पष्ट केलं.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI