AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का? सध्या मनोरंजन सृष्टीवर गाजवतेय अधिराज्य!

रश्मिकाचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच खूप चर्चेत येतो. आपल्या किलर स्टाईलने सर्वांची मने जिंकणाऱ्या रश्मिकाने नुकताच तिच्या बालपणीचा क्युट फोटो शेअर केला आहे.

फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का? सध्या मनोरंजन सृष्टीवर गाजवतेय अधिराज्य!
रश्मिका मंदना
| Updated on: May 21, 2021 | 12:34 PM
Share

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Madanna) आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. त्याच्याकडे एक नाही तर दोन मोठे बॉलिवूड चित्रपट आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या ती खूप व्यस्त आहे. व्यस्त असताना देखील रश्मिका सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह राहत असून, तिचे क्युट आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. जे पाहून तिचे चाहते नेहमीच घायाळ होतात (Rashmika Mandanna share childhood cute photo on social media).

रश्मिकाचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच खूप चर्चेत येतो. आपल्या किलर स्टाईलने सर्वांची मने जिंकणाऱ्या रश्मिकाने नुकताच तिच्या बालपणीचा क्युट फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती इतकी गोंडस दिसत आहे की, चाहत्यांची या फोटोवरून नजरच हटत नाहीय.

पाहा रश्मिकाचा बालपणीचा फोटो

रश्मिकाने हा क्युट फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘मी हा कोरोना निघून जाण्याची वाट पहात आहे.’ हा फोटो 24 लाखाहून अधिक लोकांना आवडला आहे. अनेक सेलेब्स आणि चाहते या रश्मिकाच्या फोटोवर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘हा खरोखर खूप सुंदर फोटो आहे.’

फुलांसोबत फोटो शेअर

रश्मिकाने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती फुलं दाखवून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तो फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘फ्लॉवर, फ्लॉवर फ्लॉवर.. थोड्या सकारात्मकतेसह काही फुले हवीत.. आनंद..आशा आणि प्रेम पूर्ण…’(Rashmika Mandanna share childhood cute photo on social media)

अफेअरबद्दल बोलताना रश्मिका म्हणते…

मनोरंजन विश्वात रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या अफेअरच्या बातम्या सतत येतच असतात. दोघेही या बातम्यांना फेटाळून लावत आम्ही एकमेकांचे केवळ चांगले मित्र असे म्हणतात. विजय आणि रश्मिका बर्‍याचदा एकत्र फिरताना दिसतात.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर रश्मिका अभिनेता अल्लू अर्जुन सोबत ‘पुष्पा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा अल्लू अर्जुन याचा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे रश्मिका बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या सिनेमात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​सोबत दिसणार आहे. याशिवाय रश्मिका महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ‘गुडबाय’ चित्रपटात दिसणार आहे. जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले, तेव्हा तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली होती.

(Rashmika Mandanna share childhood cute photo on social media)

हेही वाचा :

PHOTO | ‘ये हसीं वादियां, ये खुला आसमां…’ गायिका नेहा कक्करची उत्तराखंड सफर, पाहा फोटो

कधी काळी एकमेकांचे खास मित्र होते संजय दत्त-गोविंदा, ‘या’ एका चुकीमुळे तुटले नाते!

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.