Raveena Tandon: औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसींचं रवीना टंडनकडून समर्थन? ट्विट चर्चेत

Raveena Tandon: औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसींचं रवीना टंडनकडून समर्थन? ट्विट चर्चेत
Raveena Tandon
Image Credit source: Facebook

ओवैसींच्या या कृत्याबद्दल महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असताना आता अभिनेत्री रवीन टंडनने (Raveena Tandon) त्यांच्या कृत्याचं समर्थन केल्याचं म्हटलं जात आहे. रवीनाने यासंदर्भात एक ट्विट केलं असून सध्या सोशल मीडियावर त्या ट्विटची चर्चा होत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 15, 2022 | 1:58 PM

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी खुलताबादमधील औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर डोकं टेकलं होतं. त्यांच्यासोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारिस पठाण हेसुद्धा उपस्थित होते. ओवैसींच्या या कृत्याबद्दल महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असताना आता अभिनेत्री रवीन टंडनने (Raveena Tandon) त्यांच्या कृत्याचं समर्थन केल्याचं म्हटलं जात आहे. रवीनाने यासंदर्भात एक ट्विट केलं असून सध्या सोशल मीडियावर त्या ट्विटची चर्चा होत आहे. ‘काही काळापूर्वी माझ्या मातृभूमीला ‘असहिष्णू’ असं लेबल लावणं म्हणजे एक फॅशन बनलं होतं. यावरून आपण किती सहनशील आहोत आणि किती सहन करू शकतो हे सिद्ध होतं. हे एक उदाहरण आहे. मग असहिष्णुता कुठे आहे’, असा सवाल तिने केला.

या ट्विटसोबतच रवीनाने लेखक आनंद रंगनाथन यांचंही ट्विट शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही सहनशील आहोत, होतो आणि राहू. हा एक स्वतंत्र देश आहे आणि इथे कोणाचीही पूजा करता येते. इथे सर्वांना समान अधिकार आहे’, असं रवीनाने या ट्विटमध्ये लिहिलंय. लेखक आनंद रंगनाथन यांनी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकणाऱ्या ओवैसींचा फोटो शेअर करताना निशाणा साधला होता.

रवीनाचं ट्विट-

अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला. शिवसेना आणि भाजपनं त्यावर प्रतिक्रिया दिली होती. औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं, “मुस्लीम लोक औरंगजेबाच्या कबरीवर जात नाहीत. कारण औरंगजेब दुष्ट होता. मुस्लीम आणि हिंदू समाजाला त्याने त्रास दिला. अशा माणसाच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवणं हा हिंदू-मुस्लीमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”

“मुस्लीम असले तरी त्यांनी राष्ट्रभक्तीनं राहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावण्याचं काम त्यांच्या या कृतीने होत आहे, त्याचा आम्ही निषेध करते”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली होती.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें