Salman Khan Upcoming Film | ‘रेड’ फेम दिग्दर्शक राजकुमार गुप्ताची स्क्रिप्ट सलमानला आवडली! अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत?

सध्या अभिनेता सलमान खान (Salman khan) त्याच्या आगामी 'भाईजान' (Bhaijan) या चित्रपटासाठी खूप चर्चेत आहे. दरम्यान, त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. एका अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटासाठी सलमानने दिग्दर्शक राजकुमार गुप्ता (Raj Kumar Gupta) यांच्याशी हातमिळवणी केल्याचे वृत्त आहे.

Salman Khan Upcoming Film | ‘रेड’ फेम दिग्दर्शक राजकुमार गुप्ताची स्क्रिप्ट सलमानला आवडली! अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत?
सलमान खान

मुंबई : सध्या अभिनेता सलमान खान (Salman khan) त्याच्या आगामी ‘भाईजान’ (Bhaijan) या चित्रपटासाठी खूप चर्चेत आहे. दरम्यान, त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. एका अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटासाठी सलमानने दिग्दर्शक राजकुमार गुप्ता (Raj Kumar Gupta) यांच्याशी हातमिळवणी केल्याचे वृत्त आहे. राजकुमार गुप्त ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘रेड’, ‘आमिर और घनचक्कर’ या चित्रपटांसाठी ओळखले जातात. या अहवालानुसार राजकुमार-सलमानचा आगामी चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट असणार आहे. तथापि, अद्याप यासंदर्भात कोणाकडूनही अद्याप अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही (Salman Khan is interested in Raj Kumar Gupta action thriller film).

सलमानला आवडली राजकुमारची पटकथा

पिंकविलाच्या वृत्तानुसार, एका सूत्रांनी सांगितले की, राजकुमारच्या अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटात सलमानने काम करण्यास रस दाखवला आहे. दोन्ही टीममध्ये बैठक आहे. यानुसार असे दिसते आहे की, पुढील योजनेनुसार काम सुरू झाले आहे. राजकुमारची पटकथा सलमानला खरोखरच आवडली आहे आणि त्याला या चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. या प्रकल्पावर अंतिम स्तरावर दोघांची चर्चा सुरू आहे.

भारतीय इतिहासाच्या खऱ्या घटनांनी प्रेरित असणार चित्रपट

अहवालात असेही म्हटले आहे की, जर सर्व काही नियोजित योजनेनुसार सुरु राहिले, तर येत्या दोन महिन्यांत चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन काम सुरू होईल. या चित्रपटाची कहाणी भारतीय इतिहासाच्या खर्‍या घटनेतून प्रेरित आहे. चित्रपटाची कथा मूळ असेल, स्वत: राजकुमार यांनी ही लिहिली आहे. लॉकडाऊन दरम्यान दिग्दर्शकाने चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करण्यासाठी बरेच संशोधन केले आहे. यादरम्यान, त्याने सलमानसह अनेक लेखकांची देखील भेट घेतली आहे.

सलमानला लक्षात घेऊन बनवला जाईल चित्रपट

या अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, सलमान आणि दिग्दर्शक ज्या चित्रपटासाठी चर्चेत आहेत, तो एक थ्रिलर चित्रपट असेल. ज्याची पटकथा सलमानची स्थिती लक्षात घेऊन तयार केली जात आहे. जर सूत्रांच्या वृत्तावर विश्वास ठेवला, तर सलमानशिवाय इतर कोणीही या चित्रपटाची व्यक्तिरेखा इतकी चांगल्या प्रकारे निभावू शकणार नाही. सलमानच्या उर्वरित चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातही संपूर्ण अ‍ॅक्शन, ड्रामा आणि साहस यांचा समावेश पाहायला मिळेल.

‘कभी ईद कभी दिवाली’ चे शीर्षक बदलले

यापूर्वी सलमान खान आपल्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाचे शीर्षक बदलण्यासाठी चर्चेत आला आहे. अहवालानुसार सलमानने ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाचे शीर्षक बदलून ‘भाईजान’ असे ठेवले आहे. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2022 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

(Salman Khan is interested in Raj Kumar Gupta action thriller film)

हेही वाचा :

Anushka Sen | अभिनेत्री अनुष्का सेनला कोरोनाची लागण, ‘खतरों के खिलाड़ी’वर स्थगितीचे सावट!

Happy Birthday Lisa Haydon | तिसऱ्यांदा आई बनणार लिसा हेडन, प्रेगन्सी लूकनेही देतेय बड्या अभिनेत्रींना टक्कर!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI