Salman Khan: सलमान खानला मुंबई पोलिसांनी दिला बंदुकीचा परवाना; जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर केला होता अर्ज

सलमानने काही दिवसांपूर्वी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता आणि या संदर्भात त्याने 22 जुलै रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचीही भेट घेतली होती.

Salman Khan: सलमान खानला मुंबई पोलिसांनी दिला बंदुकीचा परवाना; जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर केला होता अर्ज
सलमान खानच्या बॉडी डबलचा हृदयविकाराने मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 9:44 AM

काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानला (Salman Khan) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून (Lawrence Bishnoi gang) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मॉर्निंग वॉक करताना सलमान खानचे वडील सलीम खान यांना बेंचवर पडलेलं एक पत्र सापडलं होतं, ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर सलमानने स्वसंरक्षणासाठी (self-protection) बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता. आता मुंबई पोलिसांनी त्याला परवाना जारी केला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला. सलमानने काही दिवसांपूर्वी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता आणि या संदर्भात त्याने 22 जुलै रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचीही भेट घेतली होती. नाव न सांगण्याच्या अटीवर आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं की, “सलमान खानच्या प्रतिनिधीने पोलिस मुख्यालयाशी संबंधित शाखेतून परवाना घेतला. त्या व्यक्तीची पावती घेतल्यानंतर त्याच्याकडे परवाना देण्यात आला आहे.”

‘सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच आम्ही अभिनेत्याला शस्त्र परवाना जारी केला आहे’, असं त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, पुढील प्रक्रियेनुसार फाइल पडताळणीसाठी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे (झोन 9) पाठविण्यात आली होती. तसंच अभिनेत्याचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का याचीही पाहणी करण्यात आली. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याची सुरक्षा 6 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. मॉर्निंग वॉक करत असताना सलीम खान यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. हे पत्र मिळाल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्याच्या घराबाहेर पोलिस व्हॅनही तैनात करण्यात आली होती.

सलमान खानला दिलेल्या धमकीबाबत बिश्नोईची चौकशी

सलमानला धमकीचं पत्र मिळाल्यानंतर दिल्लीतील तुरुंगात कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. मात्र बिश्नोईने सलमानला धमकी दिल्याची बाब नाकारली होती. आपल्या नावे कुणीतरी हे धमकीचं पत्र दिल्याचं बिश्नोईने पोलीस चौकशीत सांगितलं. मात्र काही वर्षांपूर्वी सलमाने हरणाची शिकार केली होती. त्यामुळे त्याच्यावर नाराज झाल्याने आपण त्यावेळी आपला सहकारी संपत नेहरा याला सलमानच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली त्याने दिली. या कामासाठी 3 ते 4 लाख रुपयांची स्पेशल आरके स्प्रिंग रायफलची ऑर्डरही दिली होती. मात्र त्याआधीच त्याला अटक झाली होती.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.