मुंबई : महाराष्ट्राचा जावई आणि साऊथ इंडस्ट्रिचा स्टार महेश बाबू (Mahesh Babu) यानं आपल्या सिनेमाची दणदणीत इन्ट्री केली आहे. बॉक्सऑफिसवर (Box Office Collection) या सिनेमाचा दबदबा पाहायला मिळतोय. महेश बाबूच्या सिनेमाने ओपनिंग कलेक्शन तब्बल 36.01 कोटी रुपयांचं केलंय. कमाईचे हे आकडे फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील कामगिरीचे आहेत. महेश बाबूचा सरकारु वारी पाटी (Sarkaru Vaari Paata) या सिनेमाची उत्सुकता गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्यांना होती. अखेर हा सिनेमा रिलीज झाला असून प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी सिनेमाला डोक्यावर घेतलंय. सराकरु वारी पाटी हा सिनेमा 12 मे रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी दणदणीत कमाई या सिनेमानं करुन दाखवली आहे. येत्या काळात ही कमाई कशी सुरु राहते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण साऊथच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवे विक्रम करणं सुरुच ठेवल्याचं आणि या सिनेमांना आर्थिकदृष्ट्या भरभराटीचे दिवस आले असल्याचंही यानिमित्तानं पाहायला मिळतंय. दरम्यान, देशभरातील कमाईचा आकडा हा 50 कोटी 10 रुपये इतका झालाय.
View this post on Instagram
वर्षभरानंतर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या महेश बाबू यांच्या सिनेमाची जादू यूएसएमध्येही चालतेय. 11 मे रोजी यूएसएमध्ये महेश बाबूचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तिथंही या सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. महेश बाबूनं केलेला कमबॅक दमदार असल्याचं कमाईच्या आकड्यांवरुन अधोरेखित झालंय.
#SVP mania continues!🥳
Touched 1.2 Million+ Gross mark at USA Box Office💰#BlockbusterSVP#SVPUsaSandhadi
🇺🇸 Release by @FlyHighCinemas , @ShlokaEnts & Classics Ent’s
Super 🌟 @urstrulyMahesh @ParasuramPetla @GMBents @MythriOfficial @14ReelsPlus #SarkaruVaariPaata pic.twitter.com/AeJyMJ58gL
— FlyHigh Cinemas (@FlyHighCinemas) May 13, 2022
फक्त साऊथमध्ये नव्हे, तर उत्तर भारतात महेश बाबूची लोकप्रियता प्रचंड आहे. अनेकांना महेश बाबू यांना हिंदीत काम करताना पाहण्याचीही इच्छा आहे. बॉलिवूडमध्येही काम करण्याबाबत महेश बाबू यांनी हल्लीच एक मोठ विधान केलं होतं.
View this post on Instagram
बॉलिवूडला मी परवडणार नाही, असं म्हणत महेश बाबूने बॉलिवूडच्या सगळ्यांच निर्मात्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर एक वाद उफाळून आला होता. परवडणार नसल्यामुळेच बॉलिवूडमध्ये काम करण्यात वेळ वाया नाही घालवायचा, असंही महेश बाबूने म्हटलं होतं.