AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर बलात्काराचा आरोप, अभिनेत्याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, वाचा संपूर्ण प्रकरण

हे सर्व सुरू असतानाच दुबईमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने देखील अभिनेत्यावर आरोप केले होते. सपना हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आरोप केले होते.

Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर बलात्काराचा आरोप, अभिनेत्याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, वाचा संपूर्ण प्रकरण
| Updated on: Feb 24, 2023 | 8:10 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा प्रचंड चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पर्सनल लाईफ सध्या चवाट्यावर आलीये. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी ही अभिनेत्यावर सतत गंभीर आरोप करत आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. आलिया सिद्दीकी (Alia Siddiqui) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे भांडण आता थेट कोर्टात पोहचले असून आलियाचे आरोप ऐकून अभिनेत्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. मुळात कोरोनामध्येच हा वाद (Dispute) सुरू झाला. मात्र, त्यानंतर आलिया आणि नवाजुद्दीन यांच्यामध्ये काही गोष्टी व्यवस्थित झाल्याचे कळले होते.

आलिया सिद्दीकी ही सतत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप करत आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी याच्याही आईने आलिया सिद्दीकी विरोधात पोलिसांमध्ये धाव घेत तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. आता हे सर्व प्रकरण कोर्टात सुरू आहे.

हे सर्व सुरू असतानाच दुबईमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने देखील अभिनेत्यावर आरोप केले होते. सपना हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आरोप केले होते. ज्याचा व्हिडीओ आलिया सिद्दीकीच्या वकिलाने सोशल मीडियावर शेअर केला. मात्र, त्यानंतर आपण हे सर्वकाही दबावामध्ये केल्याचे सपनाने म्हटले.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आयुष्यामधील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. नुकताच नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी हिने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्येही तिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर काही गंभीर आरोप करत आपल्या मुलांना आपल्यापासून दूर करत असल्याचे तिने म्हटले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने त्याच्यावर थेट बलात्काराचा देखील केलाय. या व्हिडीओमध्ये आलिया हिने नवाजुद्दीन सिद्दीकी हा चांगला बाप नसल्याचे देखील म्हटले असून त्याने कधीच आपल्या मुलांना बापाचे प्रेम दिले नसल्याचे म्हटले असून तो त्याच्या पाॅवरचा चुकीचा वापर करत असल्याचाही आरोप आलियाने केला.

या व्हिडीओमध्ये आलिया सिद्दीकी ही ढसाढसा रडताना दिसत आहे. आलिया म्हणाली की, माझ्या मुलांना बाप कसा असतो हे देखील अजून माहिती नाहीये. आलिया हिने म्हटले की, काल मुंबईमधील वर्सोवा पोलिस ठाण्यात पुराव्यासह मी बलात्काराची तक्रार दाखल केलीये. काहीही झाले तरीपण मी माझ्या मुलांचा ताबा याच्या हातामध्ये कधीच देणार नाहीये…

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.