AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan | शाहरुख खान याने काैतुक करत शेअर केले लेकाच्या जाहिरातीचे टीझर, आर्यन याने चक्क

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. फक्त शाहरुख खान याचा मुलगाच नाही तर मुलगी सुहाना खान देखील बाॅलिवूड चित्रपटांमध्ये आपला जलवा दाखवणार आहे.

Aryan Khan | शाहरुख खान याने काैतुक करत शेअर केले लेकाच्या जाहिरातीचे टीझर, आर्यन याने चक्क
| Updated on: Apr 24, 2023 | 10:00 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा हाच चित्रपट (Movie) ठरलाय. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळत होती. शाहरुख खान याने पठाण (Pathaan Movie) चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. शाहरुख खान याचा 2019 मध्ये झिरो हा चित्रपट रिलीज झाला आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.

झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात होते. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने ओनपिंग डेलाच जगभरातून तब्बल 100 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करत सर्वांना मोठा धक्का दिला.

नुकताच शाहरुख खान याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा दिसत आहे. हा व्हिडीओ एका जाहिरातीचा अर्धेवट व्हिडीओ आहे. हा जाहिरातीचा टिझर व्हिडीओ आहे.  या जाहिरातीमधील विशेष बाब म्हणजे हा व्हिडिओ दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केला आहे. ही जाहिरात पूर्ण उद्या प्रदर्शित केली जाणार आहे. ही एका मोठ्या ब्रॅन्डची जाहिरात आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आर्यन खान याचे काैतुक करत शाहरुख खान याने ही पोस्ट शेअर केलीये.  शाहरुख खान याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर चाहते देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. आयपीएल मॅच बघण्यासाठी आर्यन खान हा चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे हिच्यासोबत पोहचला होता. या दोघांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी एका पार्टीमधून बाहेर पडत असताना अनन्या पांडे ही आर्यन खान याची वाट पाहत बाहेर थांबली होती. आर्यन खान हा दिसताच ती त्याच्या दिशेने धावली होती. मात्र, आर्यन खान हा अनन्या पांडे हिच्याकडे दुर्लक्ष करत गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसले होते. त्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान याचे नाव पलक तिवारी हिच्यासोबत जोडले जात आहे. विशेष म्हणजे आर्यन खान याच्याबद्दल मोठा खुलासा करताना पलक तिवारी ही दिसली होती.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.