Shamshera | शमशेरा फ्लॉप झाल्यानंतर दिग्दर्शक करण भावूक, केआरकेने ट्विट करत म्हटले की, तुमचे चित्रपट कोरोनापेक्षाही खतरनाक…

चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर दिग्दर्शक करणने एक नोट शेअर केली आहे. करण यांनी लिहिले आहे की, माझ्या प्रिय शमशेरा, तू तुझ्यासारखाच भव्य आहेस. या व्यासपीठावर व्यक्त होणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण इथेच तुमच्यासाठी प्रेम, द्वेष, उत्सव आणि अपमान आहे.

Shamshera | शमशेरा फ्लॉप झाल्यानंतर दिग्दर्शक करण भावूक, केआरकेने ट्विट करत म्हटले की, तुमचे चित्रपट कोरोनापेक्षाही खतरनाक...
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 12:00 PM

मुंबई : रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ (Shamshera) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटांपैकी एक होता. मात्र, या चित्रपटाची जेवढी चर्चा झाली, तेवढी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box office) कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाला समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि प्रेक्षकांनीही चित्रपटाला प्रेम दिले नाही. 22 जुलै रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट फ्लॉप ठरला. यामुळेच दिग्दर्शक करण मल्होत्रा (Karan Malhotra) ​​भावूक झाल्याचे दिसले. चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर करण मल्होत्राने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नोट शेअर केलीयं.

करण मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट पाहा

चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर दिग्दर्शक करण मल्होत्राने एक नोट शेअर केली

चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर दिग्दर्शक करणने एक नोट शेअर केली आहे. करण यांनी लिहिले आहे की, माझ्या प्रिय शमशेरा, तू तुझ्यासारखाच भव्य आहेस. या व्यासपीठावर व्यक्त होणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण इथेच तुमच्यासाठी प्रेम, द्वेष, उत्सव आणि अपमान आहे. गेल्या काही दिवसांपासून मला ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याबद्दल मला माफी मागायची आहे, कारण मी द्वेष आणि राग सहन करू शकत नाही. माझे परत येणे ही माझी कमजोरी होती. यासाठी कोणतेही निमित्त नाही, परंतु आता मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझे आहात याचा मला तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा अभिमान आणि सन्मान वाटतो. आम्ही सर्व गोष्टींना एकत्र तोंड देऊ, मग ते चांगले असो वा वाईट.

KRK यांनी शेअर केलेली पोस्ट पाहा

कमाल रशीद खान म्हणाले तुमचे चित्रपट कोरोनापेक्षाही खतरनाक

करण मल्होत्राने ही नोट शेअर केल्यानंतर काही वेळाने कमाल रशीद खान म्हणजेच केआरकेने यांनी टिंगल उडवल्याचे दिसते आहे. एका ट्विटमध्ये केआरके यांनी लिहिले की, हे बॉलीवूडचे वागणे आहे. खराब चित्रपट बनवल्याबद्दल ते कधीही माफी मागत नाहीत. त्याचा चित्रपट हा चांगला असल्याचे ते नेहमी म्हणतात. लोकच मूर्ख आहेत, ज्यांना त्यांचा चित्रपट आवडला नाही, अरे भाऊ, आता विश्वास ठेवा, तुमचा चित्रपट कोरोनापेक्षाही खतरनाक आहे. शमशेरा चित्रपटाने सहा दिवसांत सुमारे 39 कोटींचा व्यवसाय केला आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.