AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | बॉलिवूड पदार्पणापूर्वीच शनाया कपूरने उडवली चाहत्यांची झोप, पाहा तिचा जबरदस्त ‘बेली डान्स’

चित्रपटांमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वीच शनाया बर्‍यापैकी प्रसिद्ध झाली आहे. अभिनेता संजय कपूरची मुलगी केवळ सुंदरच नाही तर, एक अतिशय उत्तम नर्तक देखील आहे.

Video | बॉलिवूड पदार्पणापूर्वीच शनाया कपूरने उडवली चाहत्यांची झोप, पाहा तिचा जबरदस्त ‘बेली डान्स’
शनाया कपूर
| Updated on: Apr 03, 2021 | 3:43 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday), सोनम कपूर(Sonam Kapoor) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सारखे अनेक स्टारकिड्सनी मोठ्या पडद्यावर डेब्यू केला आहे. आता लवकरच या यादीमध्ये आणखी एक नाव जोडले जाणार आहे. अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. करण जोहरने नुकतीच शनायाला लाँच करण्याची घोषणा केली होती (Shanaya Kapoor sizzling Belly Dance video goes viral).

शनाया जुलै महिन्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशा परिस्थितीत शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या अगोदरच चाहत्यांना झोप उडवली आहे. सध्या शनायाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येत आहेत. शनाया पदार्पणाआधीच प्रचंड चर्चेत आली आहे. नुकताच तिने ‘बेली डान्स’ करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले आहे.

शनायाची चर्चा!

चित्रपटांमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वीच शनाया बर्‍यापैकी प्रसिद्ध झाली आहे. अभिनेता संजय कपूरची मुलगी केवळ सुंदरच नाही तर, एक अतिशय उत्तम नर्तक देखील आहे. प्रतिभेच्या जोरावर शनाया कपूर सोशल मीडियावर हिट ठरत असून, तिची लांबलचक फॅन फॉलोइंग तयार होत आहे.

सध्या शनायाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो तिने स्वत: शेअर केला आहे. या चर्चित व्हिडीओमध्ये शनाया बेली डान्स करताना दिसत आहे. तिचा हा बेली डान्सचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

पाहा शनायाचा जबरदस्त बेली डान्स

 (Shanaya Kapoor sizzling Belly Dance video goes viral)

शनायाने जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात ती तिची मैत्रीण संजनासोबत बेली डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना शनायाने कॅप्शनमध्ये लिहिले की, फ्लोर वर्क शिकणे नेहमीच एक आव्हान असते. मला यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल @sanjanamuthreja दिल्याबद्दल धन्यवाद.’ तिच्या इतर व्हिडीओंपेक्षा वेगळ्या असणाऱ्या या व्हिडीओमध्ये शनाया फ्लोरवर मैत्रिणीबरोबर बेली डान्स करताना दिसली आहे.

शनायाचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्यांनी व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चाहत्यांनी आधीच तिच्या डोळ्यांचे कौतुक केले होते. या व्हिडीओनंतर आता अभिनेत्रीच्या सौंदर्याचेही कौतुक केले गेले आहे.

सोशल मीडियावर शनायाची क्रेझ

शनायाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले, तरी सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. शनायाच्या शैलीतून हे स्पष्ट झाले आहे की, ती पदार्पणानंतर नव्या आणि जुन्या सगळ्याच अभिनेत्रींना मागे सोडणार आहे. शनायासोबत सुहाना खान, अनन्या पांडे आणि नव्या नवेली नंदा या स्टारकिड्स देखील मनोरंजन विश्वात पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. शनाया आता 21 वर्षांची आहे. तिचा जन्म 3 नोव्हेंबर 1999 रोजी झाला होता. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा आता शनायाच्या पदार्पणावर टिकल्या आहेत.

(Shanaya Kapoor sizzling Belly Dance video goes viral)

हेही वाचा :

Video | कश्मीरा शाहचं बॉडी ट्रान्सफॉरमेशन, ब्लू बिकिनीत दिसला ग्लॅमरस अंदाज, पाहा व्हिडीओ…

PHOTO | सिल्व्हर शिमरी ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जलवा, फोटो पाहून चाहते म्हणाले ‘हाय गर्मी..’

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.