शाहरुख खानच्या चाहत्यांची आतुरता संपली, अखेर ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, पाहा सेटवरील खास फोटो!

शाहरुख खानच्या चाहत्यांची आतुरता संपली, अखेर 'डंकी' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, पाहा सेटवरील खास फोटो!

शाहरुखचे जे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ते चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे सांगितले जात आहे. सध्या शाहरूख त्याच्या डंकी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, या फोटोंमध्ये शाहरुख अगदी साध्या लूकमध्ये दिसतो आहे. टी-शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये शाहरुखचा लूक अत्यंत जबरदस्त दिसतो आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 12, 2022 | 1:52 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) नेहमीच चर्चेत असतो. आता शाहरुख खान चर्चेत असण्याचे कारणे म्हणजे त्याचा आगामी चित्रपट आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, नुकताच शाहरुखने त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या (Movie) शूटिंगदरम्यानचे काही फ्रेश फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुखचे व्हायरल होत असलेले फोटो शाहरुखच्या फॅनक्लब सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख चित्रपट दिग्दर्शक राज कुमार यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे. सध्या हे फोटो (Photo) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

चित्रपटाच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

शाहरुखचे जे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ते चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे सांगितले जात आहे. सध्या शाहरूख त्याच्या डंकी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, या फोटोंमध्ये शाहरुख अगदी साध्या लूकमध्ये दिसतो आहे. टी-शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये शाहरुखचा लूक अत्यंत जबरदस्त दिसतो आहे. डंकी या चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर शाहरुख खान 2018 मध्ये झिरो चित्रपटामध्ये शेवटचा दिसला होता. आता तो थेट 2022 मध्ये डंकी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये दिसतो आहे.

इथे पाहा चित्रपटासंदर्भातील पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

राज कुमार हिरानीबद्दल शाहरूख खान म्हणाला…

या चित्रपटाबाबत शाहरुख म्हणतो की, राज कुमार हिरानी यांच्यासोबत काम करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मी खूप भाग्यवान आहे की मी या पिढीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासोबत काम करत आहे. शाहरूख पुढे म्हणाला की आम्ही या महिन्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 22 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख आणि तापसीची ही धमाकेदार जोडी त्यांच्या चाहत्यांचे किती मनोरंजन करते हे पाहण्यासारखेच ठरणार आहे. मात्र, सध्या शाहरुख खानचे फॅन्स त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें