Drugs Case | आर्यनला ड्रग्ज पुरवले, पण कोणत्याही पेडलरच्या संपर्कात नाही! अनन्या पांडेची NCB समोर कबुली

अभिनेत्री अनन्या पांडेच्या (Ananya Panday) चौकशीच्या दुसऱ्या फेरीत (गुरुवारी) 4 तासांच्या चौकशीत, NCB ने ड्रग्ज पेडलर्सच्या कनेक्शन संदर्भात चौकशी केली आहे. नेमकी अनन्याने एनसीबी अधिकाऱ्यांना काय माहिती दिली आहे, त्याबाबतचा एक्सक्लुसिव्ह माहिती समोर आली आहे.

Drugs Case | आर्यनला ड्रग्ज पुरवले, पण कोणत्याही पेडलरच्या संपर्कात नाही! अनन्या पांडेची NCB समोर कबुली
Aryan-Ananya Panday
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 10:31 AM

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेच्या (Ananya Panday) चौकशीच्या दुसऱ्या फेरीत (गुरुवारी) 4 तासांच्या चौकशीत, NCB ने ड्रग्ज पेडलर्सच्या कनेक्शन संदर्भात चौकशी केली आहे. नेमकी अनन्याने एनसीबी अधिकाऱ्यांना काय माहिती दिली आहे, त्याबाबतचा एक्सक्लुसिव्ह माहिती समोर आली आहे. या दरम्यान, अनन्या पांडेने एनसीबीच्या चौकशी दरम्यान कबूल केले की, तिने आर्यन खानला वीड अर्थात गांजा दिला होता, पण ती कोणत्याही ड्रग पुरवठादार किंवा ड्रग्ज पेडलरशी संपर्कात नाही.

एनसीबीच्या सूत्रांच्या आधारे अनन्या पांडेकडून जे चॅट मिळालेले आहेत त्या संदर्भात अनन्या पांडेने एनसीबीच्या चौकशीत सांगितले की, ती वीड पुरवण्याच्या व्यवसायात असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात नाही. तिचा एक मित्र आहे जो प्रसिद्ध,  प्रभावशाली व्यक्ती आहे आणि तो मांगणी केल्यावर अरेंज करून देतो.

मित्राच्या माध्यमातून ड्रग्जची देवाण घेवाण

आर्यनच्या सांगण्यावरून अनन्यानी या प्रभावशाली मित्राला एक-दोनदा वीड देण्यास सांगितले होते. जे त्याने त्याच्या घरच्या स्टाफ मार्फत पाठवले होते आणि अनन्याने ही तिच्या कर्मचार्‍यांमार्फत ते प्राप्त केले होते. आणि नंतर जेव्हा ती आर्यन खानला भेटली तेव्हा तिने ते आर्यनला दिले, ज्याचा या चॅटमध्ये उल्लेख आहे.

एनसीबीने शुक्रवारी पहाटे संबंधित कर्मचार्‍यांला चौकशीसाठी आणलं होता,  अनन्याच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये वीड पाठवणारा म्हणून ज्याचा उल्लेख करण्यात आला होता आणि त्यानंतर काल संध्याकाळी त्या हाऊस स्टाफला  जाण्याची परवानगी देण्यात आली. पण NCBने त्याचा फोन जप्त केला आहे आणि सोमवारी त्यांना पुन्हा बोलावले आहे. सोमवारी अनन्या पांडेला NCB ने तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. NCB च्या सूत्रांनुसार सदर हाऊस स्टाफ सोबत केलेल्या चौकशी आणि सीज करण्यात आलेल्या चॅटच्या माध्यमातून एका सुप्रसिद्ध सेलिब्रिटीच्या ड्रग्स कनेक्शन आणि आणि सप्लाय करणारी लिंक सापडली आहे.

अभिनेत्री म्हणते ड्रग्जबद्दल माहित नाही!

एनसीबी अनन्या पांडेच्या दोन्ही मोबाईल फोनचा डेटा रिट्राईव्ह (पुनर्प्राप्त) करण्याच्या प्रयत्न करत आहे. जेणेकरून अनन्या पांडेने चौकशीत दिलेल्या माहितीच्या तथ्यांची पडताळणी करता येईल. याच कारणासाठी अनन्या पांडेला सोमवारी पुन्हा बोलावण्यात आले आहे. अनन्याच्या म्हणण्यानुसार, तिला वीडबद्दल जास्त माहिती नव्हती. साधारणपणे ती त्याला ‘जॉईंट’च्या नावाने ओळखत असे आणि तिला हे माहित नव्हते की हा जॉइंट वीड किंवा गांजा आहे.

कुठून आला गांजा माहित नाही!

अनन्या पांडेने कबूल केले की, गेट टूगेदर दरम्यान तिने ट्राय करण्याच्या उद्देश्याने काही पफ्स घेतले होते. तिने ना ड्रग्स सप्लाय केले होते ना सेवन केले होते, असा दावा तिने केला आहे. कधी कधी मित्र मैत्रिणींचा गेट टूगेदर असतो, ज्यात ती शूटिंगवरूनच तिच्या मैत्रिणींसोबत लोकेशनवर जायची. आर्यन हा सुद्धा अनेक गेट टुगेदरमध्ये असायचा. अनेकवेळा तिने त्याला वीड सेवन करताना पाहिलं आहे. पणतो वीड किंवा गांजा तिथे कसा आला, किंवा कोण घेऊन आलं याबाबत तिला काहीच माहिती नसल्याचा तिने एनसीबीला सांगितलं आहे .

हेही वाचा :

Happy Birthday Prabhas | पॅन इंडिया स्टार प्रभास, अभिनेत्याला प्रेमाने ‘डार्लिंग’ का म्हणतात? तुम्हाला माहितेय का?

केवळ एक पात्र साकारायचे नव्हते म्हणून किशोर कुमारांनी चक्क मुंडण केले! वाचा किस्सा…

अनन्या पांडेची सलग 4 तास कसून चौकशी, समीर वानखेडे, महिला अधिकाऱ्याने विचारले प्रश्न, आता पुढे काय ?

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.